नाशिकला विमानसेवेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडणार

डॉ. भारती पवार म्हणाल्या, ४ ऑगस्टपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत होणार.
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

नाशिक : ओझर (Nashik) विमानतळ येथून स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून नाशिक-हैदराबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचेरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या विमान सेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiraditya Sindhia) यांनी त्याला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली. (centre given approval for nashik air connectivity to Delhi & Tirupati)

Dr. Bharti Pawar
पराभवाचे चटके दिलेल्या जनतेनेच मला डोक्यावर घेतले!

कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे लॉकडाऊनपूर्वी थेट नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने स्पाइस जेटमार्फत ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालू होती. कोरोना कालावधीत ही विमानसेवा खंडित झाली होती. नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार नागरी विमान वाहतूक विभागाने बोइंग ७३७ मॅक्सला परवानगी दिली असून स्पाइस जेटला देखील नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Dr. Bharti Pawar
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे विघ्न?

येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नाशिक-नवी दिल्ली विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता ही सेवा दुपारऐवजी सायंकाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विमानसेवेचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे. तसेच नाशिक (ओझर) विमानतळाचा पीपीपी मोडवर विकास करावा.

नाशिक (ओझर) विमानतळ मुंबईच्या जवळ असल्याने येथे कार्गो, नाईट लँडिंग आणि नाईट पार्किंगसाठी हब बनवण्याची मागणी करण्यात आली असून त्‍यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीयमंत्री श्री. सिंदिया यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in