आदित्य ठाकरेंच्या आधीच नाशिकचे शिवससैनिक अयोध्येत दाखल

विशेष रेल्वेने जिल्ह्यातील चौदाशेहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी अयोध्येला गेले.
Aditya Thackeray News,
Aditya Thackeray News, Sarkarnama

नाशिक : जय श्रीराम, जयभवानी, जय शिवाजी या घोषणा देत जिल्ह्यातील (Nashik) सुमारे चौदाशेहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी आज अयोध्येत दाखल होत आहेत. सोमवारी सायंकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वेने ते अयोध्येला रवाना झाले. मंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) १५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याने त्यांच्या आधीच हे कार्यकर्ते दाखल झालेत. (Shivsena leader Aditya Thakrey will visit Ayodhya on 15th June)

Aditya Thackeray News,
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार का? शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं...

हा दौरा संस्मरणीय करण्यासाठी कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाला. विशेष गाडीला झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी खासदार हेमंत गोडसे, विनायक पांडे, सुनील बागूल, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, नितीन चिडे, किरण डहाळे, प्रकाश म्हस्के, भगवान आरोटे, वैभव ठाकरे, योगेश गाडेकर, कुमार पगारे, राजू वाघसरे आदी उपस्थित होते. (Aditya Thackeray News)

Aditya Thackeray News,
अमोल मिटकरींनी पूर्ण केली वडीलांची अतिंम इच्छा

दरम्यान, काही कार्यकर्ते राहिल्यामुळे ओढ्याला गाडी थांबवून त्यांना नाशिक रोडहून कारने तेथे पोचविण्यात आले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी पदाधिकारी अयोध्येत दोन दिवस अगोदरच दाखल झाले आहेत.

शिवसैनिकांची निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रेल्वेगाडीत कार्यकर्त्यांना चहा- नाश्ता, भोजन देण्यासाठी नाशिकचे केटरर्स व त्याचे सत्तर कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक बोगीसाठी तीन कर्मचारी आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र बोगीमधून कार्यकर्त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत त्या- त्या भागातील माजी नगरसेवक आहेत.

काही पदाधिकारी मुंबई, पुण्याहून विमानाने अयोध्येला जाणार आहेत. ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यातून सोमवारी रेल्वेगाड्या रवाना झाल्या. नाशिक रोड, निफाड, मनमाड, नांदगाव, मालेगाव येथील कार्यकर्ते त्या- त्या स्थानकावरून गाडीत बसले. कार्यकर्त्यांना प्रवासात पांढरे टी- शर्ट देण्यात आले असून, त्यावर प्रभू श्रीरामाचा फोटो असून युवा सेना, शिवसेना असे लिहिलेले होते. भगवे फेटे, शाली अयोध्येत परिधान केले जाणार आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com