Shivsena: नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर हजेरी!

माजी नगरसेवकांची निष्ठा दाखवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांचा उपक्रम
Vanat Gite In shivsena Meeting
Vanat Gite In shivsena MeetingSarkarnama

नाशिक : माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या (Shivsena) प्रमुख पदाधिकारी आज मातोश्रीवर (Matoshree) हजेरी लागणार आहे. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा (Loyalty) दाखविण्यासाठी हजेरी राहणार असून, यातून किती पदाधिकारी निष्ठावंतांच्या हजेरी मोहिमेला उपस्थित राहतात. यावरून शिवसेनेचे नेतृत्व करणाऱ्यांचा कस लागणार आहे. (Shivsena nashik office bearers will show there loyalty in Mumbai)

Vanat Gite In shivsena Meeting
आमदार सांगतात, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`

खनिज मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्या पाठोपाठ ग्रामीण भागातील शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते शिंदे गटात सहभागी होत आहे. शिंदे गटात सहभागी होताना महत्त्वाची पददेखील त्यांना दिली जात आहे.

Vanat Gite In shivsena Meeting
NIA: ‘पीएफआय’संघटनेचे देशभरातील बँकांत तीन लाख अकाउंट

नाशिक शहरात शिंदे गटाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. शिंदे गटात जाण्यासाठी काही नेत्यांमध्ये चुळबुळ असले तरी शिवसैनिक मात्र जागेवर आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शहरी भागात शिंदे गट सक्रिय होत असल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीसह माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देण्याची मोहीम शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राबविली जात आहे.

शिवसेनेचे १७ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर सातपूरच्या स्वागत लॉन्स भागात गुरुवारी (ता. २२) मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना मातोश्री किंवा दादरच्या शिवसेना भवनमध्ये निष्ठा सिद्ध करण्यासाठी हजर केले जाणार आहे. शुक्रवारी शिवसेनेचे १२२ शाखाप्रमुख, युवा शिवसेनेचे १२२, महिला आघाडीच्या १२२, तर ६५ विभागप्रमुख, १८ उपमहानगरप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी खासगी वाहनाने जाणार आहे.

मिसळ पार्टीत निष्ठेचे डोस

शिवसेना एक संघ ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी सातपूरच्या स्वागत लॉन्स भागात मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. शिवसेना उपनेते बबन घोलप, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, देवा जाधव, प्रेम दशरथ पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित शिवसैनिकांना भगव्या झेंड्याची निष्ठा राखण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेना सोडून गेले त्यांचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत असल्याचे सांगण्यात आले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com