Shivsena; मंत्री, आमदार भले जाऊ दे, शिवसेना सदैव भक्कमच राहील!

नाशिक शहरातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखांना सादर केली दहा हजार प्रतिज्ञापत्र.
Uddhav Thakre
Uddhav ThakreSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना व शिवसेनेवर निष्ठा अर्पण करण्यासाठी आज कार्यकर्ते, पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. नाशिक शहरातून दहा हजार शपथपत्रे मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केली जाणार आहेत. (Shivsena workers and all people will be with Uddhav Thakre always)

Uddhav Thakre
दोन आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद

आज शहरातील शालीमार येथीव शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गेले दोन-तीन दिवस हा उपक्रम सुरु आहे. पक्षाच्या कार्यालयात त्याचा समन्वय कार्यालय चिटणीस राजू वाकसरे हे करीत आहेत.

श्री. वाकसरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व शिवसैनिक, शिवसेनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते यांची दहा हजार प्रतिज्ञापत्र संकलीत झाली आहे. दुपारी बाराला सर्व पदाधिकारी ही प्रतिज्ञापत्र घेऊन मुंबईला रवाना झाली.

Uddhav Thakre
नवा आदेश, नवीन पालकमंत्री येईपर्यंत कामे थांबवा!

नाशिक शहरातील दहा हजार प्रतिज्ञापत्र आहेत. तसेच ग्रामीण भागात देखील हे काम सुरु आहे. त्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सर्व करीत आहेत. याबाबत महानगर संघटक रवीद्र जाधव म्हणाले, आम्ही सर्व कार्यकर्ते व महाराष्ट्रातील जनता शिवसेनेबरोबरच आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाच्या मार्गावर आम्ही वाटचाल करीत आहोत. गेल्या महिनाभरात काही बंडखोर व गद्दार लोकांनी जे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

नाशिक शहरात यापूर्वीही भक्कम होती. आजही भक्कम आहे. भविष्यात देखील भक्कमपणे वाटचाल करणार आहे. आमदार, खासदार जरी सोडून गेले, तरी काहीही फरक पडणार नाही, असा दावा यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in