भारनियमनाच्या संकटात नाशिकने उर्जानिर्मितीत ६० वर्षाचे रेकॅार्ड मोडले!

भारनियमनात महानिर्मितीच्या सर्व २७ संचांमधून वीजनिर्मिती सुरू
NTPS statue at Nashik power station, Load shedding News, Nashik Latest Marathi News
NTPS statue at Nashik power station, Load shedding News, Nashik Latest Marathi News Sarkarnama

नीलेश छाजेड

नाशिक : देशभरातील कोळसा (Coal Shortage) तुटवडा आणि भारनियमनाचे चटके यात नाशिकमधून (Nashik) एक आल्हाददायक बातमी आली आहे. नाशिकच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात (NTPS) पूर्ण क्षमतेने काम सुरु आहे. गेल्या साठ वर्षात प्रथमच सर्व २७ संचांतून वीज निर्मिती सुरु असल्याने गेल्या साठ वर्षातील हे एक रेकॅार्ड ठरले आहे. (Nashik Latest Marathi News)

NTPS statue at Nashik power station, Load shedding News, Nashik Latest Marathi News
छगन भुजबळांनी अडीचवर्षात किती निधी आणला!

वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे व कोळसा तुटवड्याला अख्खा देश सामोरे जात असतांना नाशिकचा एकमेव बंद असलेला संच आज दुपारी कार्यान्वित होऊन बुधवारी महानिर्मितीचे २७ पैकी २७ संच सुरू होते. अडचणीच्या काळात नाशिक मदतीस धाऊन आले.

NTPS statue at Nashik power station, Load shedding News, Nashik Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांकडून आता चक्क सर्व पालकमंत्र्यांना भाषणबंदी!

राज्यात कोळसा टंचाई मुळे भारनियमन ची परिस्थिती उद्भवली असतांना महानिर्मितीच्या इतिहासात गेल्या 60 वर्षांत २७ पैकी २७ संचांमधून वीज निर्मिती झाली नव्हती. आज नाशिकचा एकमेव बंद असलेला संच सुरू झाल्याने कामगारांसह अधिकारी अभियंता यांनी हुश्श म्हटले.

राज्यासह देश पातळीवर सध्या कोळसा तुटवड्याची समस्या आहे. या सर्वांवर मात करीत महानिर्मिती ने देशातील 2 क्रमांकाची सर्वात जास्त वीज निर्मिती करणारी कंपनी असल्याचे सिद्ध केले.

काही वर्षांपासून महानिर्मितीचे संच मोठ्या प्रमाणात झिरो शेड्युल तर तांत्रिक कारणांमुळे व पाण्यामुळे बंद रहात होते. नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र. 4 हा पहाटे प्रज्वलित करण्यात आला व दुपारी दोन वाजेच्या सुमारास यातून वीजनिर्मिती प्रारंभ झाली. पहाटे पासून ते दुपारी २ पर्यंत मुख्य अभियंत्यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी संच कार्यान्वित होईपर्यंत तळ ठोकून होते.

नाशिक सह कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ या सहा ही केंद्रातील एकूण २७ संच सुरू आहेत. नाशिकच्या तिसऱ्या संचांमधून ही वीजनिर्मिती सुरू होऊन महानिर्मितीचा सर्व संच सुरू राहण्याचा उच्चांक आज झाला. कामगार अभियंत्यांची कमतरता असल्याने तिसरा संच सुरू करण्यास अडचणी येत होत्या. मात्र ट्रेनिंग सेंटर हुन तंत्रज्ञ व मुख्यालयाच्या प्रतीनियुक्तीवरील अभियंत्यांच्या मदतीने तिसरा संच कार्यान्वित करण्यात यश आले.

बुधवारी दुपारी नाशिक ३७२ मेगावॅट, कोराडी १७०२७, खापरखेडा ९९७, पारस ३८१, परळी ५३५, चंद्रपूर २२१०, भुसावळ ६४३ मेगावॅट तर वायू वीज केंद्र उरण येथे २३०, जलविद्युत ६१३ व सोलर ८६ अशी एकंदरीत ८३२२ मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती. या कालावधीत राज्याची वीजेची मागणी २७९८८ होती. सर्व स्तोत्रातून १८३०० मेगा वॅट वीजनिर्मिती सुरू होती. उर्वरित ९७५० मेगा वॅट केंद्राच्या हिस्स्यातून घेऊन गरज भागविण्यात आली. यामध्ये २७ पैकी २७ संच सुरू झाले ही महानिर्मितीसाठी गौरवास्पद असल्याचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांनी सांगितले

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com