Sharad Pawar Retirement News: रोजंदारीचे कामगार देखील म्हणतात, पवार साहेबच हवेत!

Sharad Pawar Announced Retirement: शरद पवार यांनी आज मुंबईत पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याचे पडसाद सगळीकडे उमटले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar New : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा यांनी आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्षपद सोडणार अशी घोषणा केली. त्याचा मोठा धक्का नाशिकच्या कार्यकर्ते व नेत्यांना बसला आहे. हा निर्णय बदलावा यासाठी नाशिकच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांनी विनंती केली. पवार साहेब तुम्ही निर्णय बदला अन्यथा रोजंदारी करणाऱ्यांची ती भूमिका असल्याचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केले. (Sharad Pawar should remain as NCP president)

शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचे नाशिकशी (Nashik) विशेष व एक वेगळा संबंध आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal) हेमंत टकले, नरहरी झिरवाळ, माजी आमदार दीपिका चव्हाण यांसह विविध नेत्यांनी त्यांना विनंती केली आहे.

Sharad Pawar
APMC Result : महाविकास आघाडीचा डंका तर शिंदे-भाजप आघाडी जमिनीवर!

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, साहेब आपण राज्यातील, देशातील जनतेचे नेते आहेत. आपल्यामुळे पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ मिळते. आपला निर्णय कोणालाही मान्य होण्यासारखा नाही. त्यामुळे आपणच अध्यक्ष रहावे, समिती वगैरे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे निर्णय तातडीने बदला. अन्य काहीही आम्हाला मान्य नाही.

यावेळी माजी आमदार हेमंत टकले म्हणाले, आपण या राज्याच्या विकासाच्या व वाटचालीतील वारकरी आहात. सगळ्यांच्या मनात शरद पवार हे नाव आहे. त्यामुळे आपण निर्णय बदलावा. तळागाळातील कार्यकर्ते व नागरिकांना फक्त शरद पवार हेच अध्यक्ष हवेत.

Sharad Pawar
Manmad APMC result : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे पानिपत!

यावेळी नरहरी झिरवाळ यांनी, साहेब, आमचे काही चुकले असल्यास सांगावे. आम्ही आमच्यात दुरुस्ती करू. आपण सांगाल तोच आदेश आम्ही पाळणार. आपल्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. अगदी रोजंदारीवर काम करणारे लोक देखील आम्हाला फोन करून तुम्ही साहेबांना सांगावे, अन्यथा आम्ही काम सोडून साहेबांना विनंती करायला येऊ. त्यामुळे काहीही करून हा निर्णय बदलावा.

यावेळी नाशिकच्या नेते, कार्यकर्ते यांना देखील धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या जिल्ह्यात पाच आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक निकाल या पक्षाच्या बाजुने लागले आहेत. १९८५ मध्ये श्री. पावर यांनी पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना केल्यावर जिल्ह्यातील सर्व चौदा आमदार या आघाडीचे निवडूण आले होते. यावेळी अनेक कार्यकर्ते मुंबईत कार्यक्रमात धरणे धरून बसले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com