Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघ; तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस आता काय कारवाई करणार ?

Nashik Graduate Constituency Election : तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस हायकमांडचे आदेश धुडकवले आहेत.
Satyajeet tambe, Sudhir tambe
Satyajeet tambe, Sudhir tambeSarkarnama

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ही उमेदवारी नाकारून आपला मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरणाऱ्या तांबे पिता पुत्रांवर काँग्रेस काय कारवाई करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. यादरम्यान काँग्रेसचे युवक नेते आणि प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे(Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यांचे वडील काँग्रेसचे नाशिक पदवीधर मधील विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली होती.

Satyajeet tambe, Sudhir tambe
China News : चीनमधील भारतीय विद्यार्थी,नोकरदार असुरक्षित; 'ही' धक्कादायक माहिती समोर

एखाद्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी जाहीर करून त्यांनी अर्जच न भरण्याचा गंभीर प्रकार काँग्रेसच्या बाबतीत घडला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आपला कोणताही अधिकृत उमेदवार न देता सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर देऊ अशी भूमिका घेतली आहे. गेल्या चार दिवसापासून या मतदारसंघातल्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाशी संधान साधलेल्या तांबे पिता पुत्रांवर आता काँग्रेस पक्ष कोणती कारवाई करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Satyajeet tambe, Sudhir tambe
karnataka Political News : सुषमा यांच्या 'त्या' विधानाची चर्चा ; जनार्दन रेड्डींच्या एन्ट्री मुळे नव्या समीकरणांची नांदी

तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस हायकमांडचे आदेश धुडकवले आहेत. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला यामुळे डॉक्टर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोघा पिता पुत्रांनी पक्षाची एक प्रकारे फसवणूक केल्याची भावना राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

यासंदर्भात प्रदेश काँग्रेसने अद्यापही कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉक्टर तांबे यांनी अर्ज भरला नाही ही बातमी आपल्याला माध्यमातून समजण्याचे स्पष्ट केले. पटोले यांच्या या स्पष्टीकरणावरून या संपूर्ण विषयात काँग्रेसमध्ये किती गोंधळ आणि समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे

Satyajeet tambe, Sudhir tambe
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

दरम्यान, मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. काही तांत्रिक कारणामुळे अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष. मनसे आणि इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी भेटणार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरल्यानंतर गुरुवारी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com