Nashik News : भाजपच्या कार्यकर्त्याची पत्नीसह आत्महत्या; कारण अस्पष्ट

पंकज भाजपचा धडाडीचा कार्यकर्ता होता.
Nashik News
Nashik News

Nashik BJP : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मालेगाव शहरात राहण्याऱ्या भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (१० जानेवारी) रात्री उघडकीस आला. पंकज दिगंबर बिरारी (वय ४०) व रेणुका पंकज बिरारी (वय ३५) असे दाम्पत्याचे नाव आहे. अचानक पंकज आणि रेणुका यांच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पंकज आणि रेणुका यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोणीच नव्हतं, म्हणून हा प्रकार उशिरा लक्षात आला. पंकज भाजपचा धडाडीचा कार्यकर्ता होता. पण कर्जबाजारीपणा आणि खासगी कंपनीने लावलेल्या तगादा याला त्रासून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा आहे. तरीही दोघांच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. पंकज ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचीही चर्चा आहे.

Nashik News
Hasan Mushrif : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे आपल्या सहकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत मालेगावच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेचा तपास सुरू केला आहे. उद्या या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com