Jayant Patil ED Enquiry : 'ईडी'च्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर; राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Nashik NCP Agitation : जयंत पाटलांच्या चौकशीवरून नाशकात आंदोलन
Nashik NCP Agitation
Nashik NCP AgitationSarkarnama

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी (ता. २२) सक्तवसुली संचलनालय चौकशी करत आहे. भाजप 'ईडी'च्या माध्यमातून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करत असल्याचा आरोप नाशिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. या चौकशीच्या निषेधार्थ शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Marathi Latest News)

जयंत पाटील (Jayant Patil) यांना 'ईडी'ने समन्स बजावले होते. त्यानंतर पाटील यांनी कौटुंबिक कारणास्तव पुढील तारीख देण्याची विनंती केली. मात्र पुन्हा नोटीस बजावून सोमवारी (ता. २२) चौकशीला हजर राहण्यास सांगितले.

याबाबत जिल्हाध्यक्ष कडलग म्हणाले, "त्यांच्यावर आयएल आणि एफएलएस कंपनीत गैरव्यावहार केल्याचा आरोप आहे. मात्र या कंपनीसोबत त्यांचा कोणताही संबंध नाही. सत्तेचा गैरवापर करत भाजप ईडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना लक्ष्य करीत आहे. यानंतर न्यायालय आरोपांना तथ्य नसल्याने नेत्यांची निर्दोष मुक्तता करते. दरम्यान या प्रकरांमुळे नेत्यांची बदनामी करून प्रतिमा मलिन करण्याचा डाव भाजपचा (BJP) आहे."

Nashik NCP Agitation
Karjat Bazar Samiti : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी : कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे गटाला ९ जागा कायम

शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी 'ईडी' कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावेच सांगितली. ते म्हणाले, "राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह सेनेचे नेते संजय राऊत यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपने लक्ष्य केले. केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून सूडाच्या भावनेतून विरोधकांची चौकशी केली जाते. जयंत पाटील हे खंबीर नेते आहेत. चौकशीला सामोरे जातानाही त्यांच्यावर राजकीय दबाव आणला. ते दबावापुढे झुकणार नाहीत. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. ते निर्दोष बाहेर पडतील."

Nashik NCP Agitation
Hingoli Political News: हिंगोलीत 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर नोटा उधळून केलं आंदोलन

यावेळी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, बाळा निगळ, दिनेश धात्रक, मुकेश शेळके, गणेश गायधनी, डॉ.संदीप चव्हाण, शाम हिरे, निलेश भंदुरे, रामदास मेदगे, गोरख ढोकणे, राहुल कमानकर, किरण पानकर, किरण भुसारे, नवराज रामराजे, विक्रांत डहाळे, महेश शेळके, संतोष जगताप, अक्षय भोसले, अमोल नाईक, तौसीफ मणियार, हर्षल चव्हाण, रवी बसते, भावेश निर्वाण, रियान शेख, शुभम भास्कर, रामेश्वर साबळे, आकाश पिंगळे, अक्षय पाटील, शांताराम झाले, तुषार खांडवाले, संदीप गोतरणे, संदीप ढेरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in