राज ठाकरे औरंगाबादच्या सभेनंतर सलीम शेख यांच्या घरी भेट देणार

तिनशे वाहने जाणार; राज ठाकरे २ मेस नाशिकमध्ये; भोंगे खरेदीवरून पोलिसांच्या मनसैनिकांना नोटिसा
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama

नाशिक : राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेनंतर ते नाशिक (Nashik) मार्गे मुंबईला परतणार आहेत. या सभेनंतर ते मनसेच्या भूमिकेचे समर्थन करीत मशिदींवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या नगरसेवक सलीम शेख (Salim Shaikh) यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यामुळे राज ठाकरे यांची नाशिक भेट देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Raj Thakre
आर्थिक विषमता हटविण्याची क्षमता केवळ सहकारात!

हिंदुत्वाची भगवी शाल पांघरल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबई, ठाणे पाठोपाठ व्हाया पुणे असा औरंगाबाद प्रवासात महाराष्ट्रदिनी जाहीर सभा होत आहे. या सभेत नाशिकहून तब्बल तीनशे वाहनांमधून एक हजार मनसैनिक औरंगाबादकडे प्रयाण करत मनसेच्या सभेला टेकू देणार आहेत.

Raj Thakre
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

या मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी राज ठाकरे नाशिकमार्गे मुंबई गाठणार असून, शहरात ते पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देतील. दरम्यान, भोंग्यावरून राजकारण पेटत असताना पोलिसांनी शंभरहून अधिक मनसैनिकांना नोटिसा पाठविल्या आहेत. भोंग्यांचा अल्टीमेटम आणि औरंगाबादची सभा जसजसी जवळ येत आहे, तसे मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे अनेक पदाधिकारी त्रस्त झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले असून, राजकारणातील पुनर्प्रवेश च्या दुसऱ्या अध्यायात त्यांनी हिंदुत्वाची भगवी शाल पांघरली आहे. मनसेच्या मुंबई येथील गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी हिंदुत्वाचा शंख फुंकल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील जाहीर सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत तीन मेला भोंगे उतरले नाही तर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असून, मनसैनिकांना नवी ऊर्जा मिळाली आहे. राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबादला महाराष्ट्रदिनी म्हणजेच एक मेस होत आहे. त्यासाठी नाशिकमधून कुमक जाणार असून, शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल तीनशे वाहनांनी एक हजार मनसैनिक औरंगाबादमध्ये पोचणार आहे. त्या व्यतिरिक्त खासगी वाहनांनीदेखील मनसैनिक औरंगाबादमध्ये पोचणार आहे.

मनसेत चैतन्य

औरंगाबादच्या सभेसाठी व्हाया पुणे पोचले असले तरी मात्र परतीच्या प्रवासात नाशिकमार्गे मुंबईत पोचणार आहे. त्यापूर्वी नाशिकमध्ये ते पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे. माजी जिल्हाप्रमुख अनंता सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. त्याशिवाय मनसेचे ज्येष्ठ नेते सलीम शेख यांच्या निवासस्थानीदेखील भेट देणार असल्याने मनसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com