ऑक्सिजनबाबत जिल्हा झाला स्वयंपूर्ण!

पालकमंत्री छगन भुजबळ उंदिरवाडी येथे पाणीयोजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
Chhagan Bhujbal News, Nashik News in Marathi
Chhagan Bhujbal News, Nashik News in MarathiSarkarnama

Nashik News in Marathi

येवला : ऑक्सिजनच्या बाबतीत आज जिल्हा (Nashik) स्वयंपूर्ण झाला असून ७०० मेट्रीक टन ऑक्सीजनसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. वेळप्रसंगी इतर जिल्ह्यानाही ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य झाले आहे. कोरोना साथरोगाच्या काळात गेली दोन वर्षे विकासकामे मंदावली असली तरी विकासाची गंगा अविरतपणे सुरू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी केले. (Nashik is prepared for medical services)

Chhagan Bhujbal News, Nashik News in Marathi
शिवसेनेच्या १४ नगरसेवकांची शिवसंपर्क अभियानाला दांडी!

तालुक्यातील उंदिरवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना व इतर विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकर्पण प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

Chhagan Bhujbal News, Nashik News in Marathi
संजय काळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचा भाजपला जोर का झटका!

ते म्हणाले, कोरोना काळात आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने सर्वात जास्त खर्च हा औषधोपचार, ऑक्सिजन यंत्रणा, रेमडिसिव्हिर, पोलिस दल व शासकीय रूग्णालये सक्षमीकरणावर करण्यात आला. या काळात अन्नधान्य पुरवठाही रास्त धान्याच्या दुकानातून मुबलक प्रमाणात करण्यात आला आहे. आता विकासाला गती दिली जात असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना (१६२ लाख), तलाठी कार्यालय (३० लाख), उंदिरवाडी अंचलगांव रस्ता दुरुस्ती (५० लाख) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. १४ व्या वित्त आयोग व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अंगणवाडी (१७ लाख), व्यायामशाळा (७ लाख) इमारतींचे उद्घाटन, जिल्हा व क्रीडा विभागांतर्गत व्यायाम साहित्य (११ लाख), आमदारांचा स्थानिक विकास निधींतर्गत उंदिरवाडी उत्तर पाटचारी रस्ता मजबुतीकरण (१५ लाख) या कामाचे लोकार्पण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, रामदास काळे, अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com