Nashik News : '' मी भाजपचा नाही,मॅच 'फिक्स' आहे की नाही ते...''; संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य

Sambhaji Raje On Nashik Election : ज्याच्याकडं पैसा तोच आमदार- खासदार होणार काय?
Sambhaji Raje
Sambhaji Raje Sarkarnama

Nashik Graduate Constituency News : आम्हांला उद्या आमदार, खासदार, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य करायचं असेल, तर तो सामान्य माणूस झाला पाहिजे. ज्याच्याकडं पैसा तोच आमदार- खासदार होणार काय? असा सवाल माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजेही यांनी केला आहे. यावेळी ही परंपरा आम्हांला बदलून टाकायची आहे असून आम्हांला आमदार, खासदार करायचं असेल तर तो शेतकरी झाला पाहिजे असंही संभाजीराजे यांनी म्हणाले आहेत.

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं.

संभाजीराजे म्हणाले, स्वराज्य हे सुराज्य व्हावं. यासाठी पाच टक्के तरी सुराज्य स्थापन करायचं आहे. तसेच गाव तिथे शाखा आणि घरोघरी स्वराज्य हा संकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत 500 शाखा झाल्या आहेत. लोकांच्या स्वराज्यकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यांना ताकद देण्यासाठी स्वराज्यची स्थापना केली. स्वराज्यचा अजेंडा पटल्यामुळे सुरेश पवार आमचे उमेदवार आहेत. सुरेश पवार निवडणुकीत चमत्कार घडविणार आहेत. प्रस्थापितांसमोर ते उभे आहेत. नाशिक आणि महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचा विश्वासही संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी व्यक्त केला.

स्वराज्यचा अजेंडा पटल्यामुळे सुरेश पवार आमचे उमेदवार आहेत. सुरेश पवार निवडणुकीत चमत्कार घडविणार आहेत. प्रस्थापितांसमोर ते उभे आहेत. नाशिक आणि महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sambhaji Raje
Devendra Fadnavis : "पुढील तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला असेल" : फडणवीसांचा दावा!

पदवीधर निवडणुकीच्या प्रचारतोफा शनिवारी(दि.२९) थंडावल्या. याचवेळी या निवडणुकीसाठीचं मतदान उद्या(दि.३०) करण्यात येणार आहे. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विरुद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत होती. मात्र, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार यांनी नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खरंतर स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्यानंतरची पहिली ही निवडणूक आहे. ज्यामध्ये स्वराज्य संघटनेनं आपला उमेदवार दिलेला आहे. यावेळी पवार यांच्या प्रचारावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, एवढ्या लोकांनी दखल घेतली म्हणून असं वाटत आहे की, सुरेश पवार विजयी होतील. मी भाजपचा नाही, मॅच फिक्स झाली आहे की नाही ते निवडणुकीनंतर कळेल. डार्क हॉर्स म्हणून आमचा घोडा आहे असंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

Sambhaji Raje
Politics : तीन दिवसांपैकी एक मिनीटही झोपलो नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला बंडखोरीदरम्यानचा किस्सा

पदवीधर निवडणुकीत सामान्य माणूस निवडून येत नाही. पण आमचा उमेदवार चमत्कार घडविणार आहे. स्वराज्यची मुहूर्तमेढ नाशिकमधून होणार आहे. मी कुठलाही प्रस्ताव ठेवणार नाही. आम्ही सज्ज आहोत. आमचा उमेदवार स्ट्राँग आहे. भाजप(BJP) ने त्यांची भूमिका जाहीर केली नाही का केली नाही ते कळलं नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com