Legislative Council Election : कॉंग्रेसच्या तांबेंना रोखण्यासाठी भाजपची खेळी; मोठा नेता उतरवणार मैदानात?

Legislative Council Election : कॉंग्रेसचे (Congress) सुधीर तांबे यांनी सलग तीन वेळा भाजप (BJP) उमेदवाराला या मतदार संघात धूळ चारून वर्चस्व निर्माण केले आहे.
Sudhir Tambe
Sudhir TambeSarkarnama

Legislative Council Election : नाशिक पदवीधर मतदार संघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु सन २००९ पासून कॉंग्रेसचे (Congress) सुधीर तांबे यांनी सलग तीन वेळा भाजप (BJP) उमेदवाराला या मतदार संघात धूळ चारून वर्चस्व निर्माण केले आहे. यावेळी त्यांना रोखण्यासाठी भाजपतर्फे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांचे आव्हाण उभे करण्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटातून व्यक्त होत आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार आणि अहमदनगर हे चार जिल्हे आहेत. या मतदार संघाची निवडणूक जाहिर झाली आहे. आचारसंहिताही लागू करण्या आली आहे. १२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. कॉंग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेचाही पाठींबा असणार आहे. त्यामुळे ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

Sudhir Tambe
Politics : मुंबई महापालिकेसाठी वंचित-शिवसेनेचं ठरलं; जागा वाटपा संदर्भात आंबेडकरांनी सांगितलं...

डॉ. सुधीर तांबे यांचा या मतदार संघात दांडगा संपर्क आहे. हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला होता. नाशिक येथील ना. स. फरांदे व धुळे येथील प्रतापदादा सोनवणे यांना भाजपतर्फे या मतदार संघाचे प्रतिधीत्व केले आहे. प्रतापदादा सोनवणे हे खासदार झाल्यामुळे सन २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेस बंडखोर म्हणून निवडणूक लढविली आणि त्यांनी भाजपचे डॉ. प्रसाद हिरे, कॉंग्रेसचे अधिकृत डॉ. नितीन ठाकरे यांचा पराभव केला.

त्यानंतर सन २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली. त्यांनी भाजपचे डॉ. सुहास फरांदे याचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. तर २०१७ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांचा तब्बल ४५ हजार मतानी पराभव करून हॅटट्रीक साधली होती. डॉ तांबे यांचा मतदार संघात संपर्क चांगला आहे. या शिवाय त्यांची कार्यकर्त्यांची फळीही आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

भारतीय जनता पक्षाने यावेळी कॉंग्रसकडून हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी कंबर कसल्याचे सांगण्या येत आहे. यावेळी तांबे यांच्यासमोर नगरमधूनच तगडे आव्हान उभे करण्याची खेळी करण्यात येणार आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधून डॉ. राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sudhir Tambe
Laxman Jagtap passed away : आता पुन्हा 'लाजवा'ची मैफल रंगणार नाही; जगतापांच्या जाण्याने कार्यकर्ते गहिवरले

पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर असताना त्यांची चर्चाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारीबाबत चर्चा नसल्याचे सांगितले होते. मात्र, भाजपकडून त्यांनाच संधी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले, कि गेल्या तीन निवडणुकीत या मतदार संघात भाजपचा उमेदवार नगर जिल्ह्यात मागे पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळी तांबे यांच्यासमोर नगरमधूनच आव्हाण उभे करण्याची भाजपची तयारी आहे.

डॉ. राजेद्र विखे पाटील हे राजकारणात नाहीत. मात्र, ते प्रवरा अभिमत विद्यापीठाने कुलपती तथा प्रवरा मेडकल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक नगर जिल्हा केंद्रीत होवून कॉंगेसचे बाळासाहेब थोरात विरूध्द राधाकृष्ण विखे पाटील अशी लढत होईल. कारण डॉ. सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरात याचे मेव्हणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in