Nashik News : उमेदवारी अर्ज भरायला काही तासांचाच अवधी ; भाजपचा सस्पेन्स कायम

Nashik Graduate Constituency news : काँग्रेसचे नेते डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेसकडून अर्ज भरत आहे. मात्र भाजपकडून सस्पेन्स कायम आहे.
Nashik Graduate Constituency news
Nashik Graduate Constituency newsSarkarnama

Nashik Graduate Constituency news : नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासांचा वेळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून अद्यापही या मतदारसंघातला उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आलेलं नाही. काँग्रेसचे नेते डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेसकडून अर्ज भरत आहे. मात्र भाजपकडून सस्पेन्स कायम आहे.

Nashik Graduate Constituency news
Prakash Ambedkar News : काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, असं आंबेडकर का म्हणाले..

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती धनराज विसपुते हे अर्ज भरण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र अद्याप त्यांनी अर्ज भरलेला नाही. त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नाही.

त्यामुळे भारतीय जनता पक्ष नेमका कोणाला उमेदवारी देणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सत्यजीत तांबेंना उमेदवारी मिळाली तर स्वागतच आहे, असे राधाकृष्ण पाटील यांनी म्हटलं आहे.

Nashik Graduate Constituency news
Punjab Politics : मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलयं ; एका मंत्र्याचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

नाशिक पदवीधर मतदारसंघावर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाने निवडणुकीची जबाबदारी ही संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे. महाजनांच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत अधिक रंग भरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in