नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची उचलबांगडी; महसूल मंत्र्यांची नाराजी भोवली?

Nashik City | Police Commissioner | Deepak Pandey : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करुन पांडे देशभर चर्चेत आले होते.
नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची उचलबांगडी; महसूल मंत्र्यांची नाराजी भोवली?
Deepak Pandey | Balasaheb Thorat Sarkarnama

नाशिक : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल २२ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांचाही समावेश आहे. पांडे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना आता मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पाठवण्यात आले आहे. तर मुंबईतील व्हीआयपी सुरक्षा विभागातील उप महानिरीक्षक जयंत नाईकनवरे (jayant Naiknaware) हे आता नाशिकचे नवे पोलिस आयुक्त (Nashik city Commissioner) असणार आहेत.

गृह विभागातर्फे बुधवारी सायंकाळी राज्यातील १४ विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली. त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर यांना देखील विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. नाईकनवरे यांनी सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोनन्नती दिली आहे.

Deepak Pandey | Balasaheb Thorat
राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल २२ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मावळते पोलिस आयुक्त पांडे यांनी माजी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या बदलीनंतर नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार घेतला होता. कोरोना काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वास्थाच्या काळजीसाठी विशेष उपक्रम राबविले. त्यानंतर शहरातील बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने हेल्मेटसक्ती, कोरोना काळात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल, हेल्मेटशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशास निर्बंध असे विविध उपक्रम राबविले होते.

Deepak Pandey | Balasaheb Thorat
पोलिसांकडून सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरचा नंबर!

एका बाजूला हे उपक्रम सुरु असतानाच गतवर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करुन पांडे देशभर चर्चेत आले होते. यानंतर यावर्षी मार्च महिन्यात पांडे यांनी एक लेटर बॉम्ब टाकून संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. महसूल विभागातील अधिकारी हे आरडीएक्स आणि डिटोनेटर असल्याचे सांगत त्यांच्याकडील आधिकार कमी करत ते पोलीस आयुक्तांना देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातीस महसूल अधिकाऱ्यांकडून याचा निषेध नोंदविण्यात येवून निर्देशने करण्यात आली होती. तसेच पोलीस आयुक्त यांनी महसूल विभागाची माफी मागावी आणि त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यादेखील पांडेंविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पांडेंनी महसूलमंत्र्यांची माफी मागत मी माझ्यावर पत्रावर ठाम असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांच्याविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांमध्ये रोष वाढला होता. राजकीय पदाधिकाऱ्यांवर विनापरवानगी मोर्चे, आंदोलन, कार्यक्रम आयोजित केल्यास गुन्हे दाखल झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मार्च महिन्यात शासनाकडे खासगी कारणास्तव विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जानुसार त्यांची विनंती मान्य झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.