भुजबळांच्या साहित्य संमेलनाला भाजपकडून नारायण राणेंच्या संमेलनाचा उतारा!

नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.
Chhagan Bhujbal & Narayan rane
Chhagan Bhujbal & Narayan raneSarkarnama

नाशिक : कोणतेही साहित्य संमेलन असो, त्यात वाद झाला नाही असे होतच नाही. त्यातही राजकीय नेते केंद्रस्थानी असले तर नसला तरीही त्यांचे प्रतिस्पर्धी वादाला कारण शोधणारच. छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असलेले साहित्य संमेलन आजपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्याला उत्तर म्हणून उद्योगस्नेही संमेलन भरविण्याचा विचार व्यक्त केला आहे. त्यासाठी चक्क नारायण राणे यांना आवतान दिले जाणार आहे.

Chhagan Bhujbal & Narayan rane
राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

साहित्य संमेलनात भाजप नेत्यांना मानाचे स्थान न दिल्याने नाराजी नाट्याचा अंक उघडलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपने संमेलनानंतर निवडणूक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संमेलनानंतर शहरात आयटी हब भूमिपूजनाचा महासोहळा नाशिककरांना बघायला मिळणार आहे. नमामि गोदा प्रकल्पानंतर भाजपसाठी हा मोठा कार्यक्रम असेल. आयटी कंपन्यांना नाशिकमध्ये निमंत्रित करण्याबरोबरच लघु उद्योगांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेणार आहे.

Chhagan Bhujbal & Narayan rane
अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे हे सिक्रेट!

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. मतदारांसमोर जाताना विकास हाच मुद्दा ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहर व ग्रामीण भागात रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प दृष्टिपथात आणले. त्यानंतर गोदावरी व उपनद्यांची प्रदूषण रोखण्यासाठी नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर नमामि गोदा प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्याचे प्रयत्न आहे.

यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या प्रारंभी या प्रकल्पाचे वाजत-गाजत उद्‌घाटन केले जाणार आहे. त्यापाठोपाठ आता आयटी हबचे उद्‌घाटन केले जाणार आहे. आयटी हबसह शहर व परिसरात लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग आणण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत भेट घेणार आहे. या वेळी आयटी हबच्या भूमिपूजनाचेही निमंत्रण देणार आहे.

संमेलनाला जशास तसे उत्तर

नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनावर राष्ट्रवादी काँग्रेसची छाप असल्याचा आरोप महापौर कुलकर्णी यांनी केला आहे. संमेलनात भाजप नेत्यांना निमंत्रित न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या नाराजी नाट्यावर तूर्त पडदा पडला असला तरी भाजप नेत्यांमध्ये संमेलन हायजॅक केल्याची सल आहे. त्यामुळे संमेलनानंतर आयटी हब, नमामि गोदा प्रकल्पाचे उद्‌घाटनाबरोबरच आयटी व लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in