शिवसेनेचा दे धक्का! फडणवीसांची पाठ फिरताच उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक गळाला

भाजपच्या (BJP) उपमहापौरासह 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shivsena) गळाला लागले आहेत.
Shivsena and BJP
Shivsena and BJP Sarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फोडाफोडीला वेग आला आहे. भाजपच्या (BJP) उपमहापौरासह 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shivsena) गळाला लागले आहेत. मुंबईत आज मातोश्रीवर या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिक दौरा केला होता. त्यांची पाठ फिरताच लगेचच भाजपला हा धक्का बसला आहे.

फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. यानंतर त्यांची पाठ फिरताच नाशिकमध्ये भाजपला गळती लागली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आगामी काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातले आहे.

Shivsena and BJP
जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरवलं पण निवडणूक आयोगानं तारलं

शिवसेनेने सुनील बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या मातोश्री आणि पुत्र हे भाजपमध्ये आहेत. बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या उपमहापौर तर पुत्र मनीष हे भाजयुमोचे शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही आता शिवसेनेमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते वसंत गिते शिवसेनेत असले त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे भाजपचे नगरसेवक आहेत. ते सुद्धा शिवसेनेत दाखल होणार आहेत. दुसरीकडे सातपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर यापूर्वी निवडून आलेली एक नगरसेविका शिवसेनेत दाखल होईल.

Shivsena and BJP
रशिया-युक्रेन वादात भारताची उडी! मोदींनी थेट पुतीन यांना फोन लावला अन् म्हणाले...

नाशिक महापालिकेची मुदत येत्या 15 मार्चला संपणार आहे. नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाला त्यावरील शिफारस अहवाल 2 मार्चपर्यंत सादर केला जाईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना आराखडा 10 मार्चपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यात ओबीसी आरक्षणाबाबत काही निर्णय झाल्यास पुन्हा प्रवर्ग निहाय आरक्षण, स्त्री-पुरुष वर्गवारी प्रसिद्ध होईल. त्यावरही हरकती मागवण्यात येतील आणि पुन्हा सुनावणी होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com