Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Shivaji Chumbhale & Devidas PingleSarkarnama

Nashik APMC Election: पिंगळे, चुंभळे लढतीत प्रचाराच शेवटपर्यंत दहशतीची चर्चा!

Nashik Bazar samiti Election: शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात प्रचारकांना दमबाजी केल्याची दुसरी तक्रार दाखल

APMC Election : नाशिक बाजार समितीची निवडणुकीत चर्चेत आली ती काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना दमबाजी झाल्याने. सबंध प्रचारात त्याची चर्चा होती. प्रचाराचा शेवट देखील श्री. चुंभळे यांनी माजी नगरसवेक शिवा भागवत यांना दमबाजी केल्याने झाली. याबाबत पोलिसांत दोन तक्रारी दाखल असल्याने या निवडणुकीत मतदारांच्या ते लक्षात राहील. (Nashik road police registered a complain against Shivaji Chumbhale)

नाशिक (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) आज मतदान होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनल आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (Shivsena) शिवाजी चुंभळे आणि भाजपचे (BJP) दिनकर पाटील यांचे पॅनल आहे.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Jalgaon APMC Election : शिंदे गटाकडून बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप; जळगावात मतदान केंद्रावर राडा

बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आज मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असल्या तरी मात्र व्यक्तीगत प्रचार सुरू आहे. तो प्रचार आता शिगेला पोहोचला असून निवडणुकीतील शेतकरी विकास पॅनलचे नेते व उमेदवार शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

माजी नगरसेवक शिवा भागवत यांना फोन वरून धमकी दिल्याने त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चुंभळे यांच्या विरोधात ही तक्रार दिली आहे. शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार असलेले शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांना देखील फोनवरून धमकी दिली होती.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
APMC Elections News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा ; दोन गट भिडले, भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..

आता पुन्हा एकदा नाशिक रोडच्या माजी नगरसेवकास धमकी दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी वादाची फोडणी पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसतंय, अर्थात ती चुरस प्रचार व मतदारांच्या संपर्कात नव्हे तर प्रतिस्पर्धी पॅनलच्या नेत्यांनी प्रचारच करायचा नाही, या भूमिकेने आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मतदार आहेत. गावगाड्याचे राजकारण हाकणारी ही मंडळी अतिशय चणाक्ष असल्याने या दहशतीचे पडसाद निश्चितच मतदानात दिसून येतील, अशी चर्चा अनुभवी मतदारांत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com