नाशिकच्या प्रशासनाने धसका घेतलेला तो `आर्यनमन` आहे तरी कोण?

जागतिक स्पर्धेत तंदुरूस्तीची कामगिरी केलेल्या खेळाडूच्या मिरवणुकीमुळे वाढली चिंता
Kailas Jadhav, Commisioner
Kailas Jadhav, CommisionerSarkarnama

नाशिक : कोरोनाच्या तिसरा व भयानक अवतारात अवतरलेल्या ओमिक्रॉन विषाणुने नाशिकची वेस ओलांडल्याचा संशय व्यक्त होत आहे. या संदर्भात शासकीय यंत्रणा व प्रशासनाने नुकताच नाशिकमध्ये प्रवेश केलेल्या जागतिक स्पर्धेत कामगिरी केलेल्या `आर्यनमन` पदकाने सन्मानीत खेळाडूची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे.

Kailas Jadhav, Commisioner
अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

दक्षिण आफ्रिकेत आर्यनमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या दोन खेळाडूंची नाशिकमध्ये परतल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आल्याने खेळाडूंसह कुटुंबीयांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने रविवारी जिल्हा प्रशासनाला दोन्ही खेळाडूंची माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने तपासणी केली.

Kailas Jadhav, Commisioner
नितीन पवार हे तर `एटी`च्याही एक पाऊल पुढे आहेत

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गाची तिसरी पिढी ओमिक्रॉनच्या रूपाने अधिक आक्रमकपणे पुढे आली आहे. त्यामुळे दिल्लीपासून गल्ली पर्यंतच्या सर्वंच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ओमिक्रॉन विषाणू जगात वेगाने परसतं असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परदेशातून विशेष करून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रत्येक नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असताना नाशिकमधून दक्षिण आफ्रिकेतील आर्यनमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या तीन खेळाडू परतल्याची बाब समोर आली. पंधरा नोव्हेंबरला दोन खेळाडू सपत्निक २६ नोव्हेंबरला नाशिकमध्ये परतले. विमानतळावर परदेशातून आलेल्या खेळाडूंची तपासणी केली जाते. कुठल्या राज्यात, शहरात जाणार याची नोंद ठेवली जाते. त्यानुसार रविवारी नाशिकमध्ये परतलेल्या तीन खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली. शहरातील वास्तव्य असल्याने जिल्हाप्रशासनाकडून महापालिकेला कळविण्यात आले. रविवारी रात्री आर्यमन स्पर्धेसाठी गेलेल्या दोन खेळाडूंशी संपर्क साधत महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेतले. महापालिकेकडे अद्यापपर्यंत स्वॅबचा अहवाल पोहोचलेला नाही. आफ्रिकेतून भारतात परतताना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने भारतात परतण्याचा परवाना खेळाडूंना मिळाला होता.

मिरवणूकात कुटुंबीय सहभागी

आर्यनमॅन स्पर्धा जिंकल्यानंतर दोन खेळाडू नाशिकमध्ये परतले. त्यावेळी नातेवाइकांनी दोघांची मिरवणूक काढली. मिरवणुकीत क्रिडाप्रेमींसह नागरिक सहभागी झाले होते. स्वॅब घेतल्यानंतर दोन खेळाडू व पत्ती असे चौघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला तरी सात दिवस होम क्वारंटाईन ठेवले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

...

आर्यनमॅन स्पर्धेतून परतलेल्या खेळाडूंचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी, सात दिवस होम क्वारंटाईन केले जाईल.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com