नरहरी झिरवाळांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

राज्य शासनाने आजपासून मंदिरे उघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले दिड वर्षे बंद असलेल्या मंदिरांची दरवाजे विधीवत पूजन करीत उघडण्यात आली.
Narhari Zirwal at Trimbkeshwar
Narhari Zirwal at TrimbkeshwarSarkarnama

नाशिक : राज्य शासनाने आजपासून मंदिरे उघण्याचा निर्णय घेतला. (State Government took decision to open all temples) त्यामुळे गेले दिड वर्षे बंद असलेल्या मंदिरांची दरवाजे विधीवत पूजन करीत उघडण्यात आली. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Maharashtra assembly acting Chairmen Narhari Zirwal worship at Trimbkeshwar temple) यांच्या उपस्थितीत आज आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजन करण्यात आले.

Narhari Zirwal at Trimbkeshwar
आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!

जिल्ह्यातील साडे तीन पीठांपैकी अर्धपीठ सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी आमदार नितीन पवार उपस्थित होते. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सायंकाळी श्री. भुजबळ यांनी जुने नाशकि येथील बडी दर्गा आणि गुरुद्वाराला देखील भेट दिली. माजी आमदार पंकज भुजबळ यांनी नस्तनपूर येथे शनी मंदिरात दर्शन घेऊन पूजन केले. सौ. शेफालीताई भूजबळ यांनी श्री काळाराम मंदिरात पूजा केली.

Narhari Zirwal at Trimbkeshwar
बच्चू कडूंना आव्हान, आत्मदहनाचा प्रयत्न, गजू घोडके आहेत कोण?

राज्य शासनाने आजपासून मंदिरे उघडली. या अनुषंगाने विधानसभेचे अध्यक्ष (प्रभारी) नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व संत निवृत्तीनाथ समाधी मंदीरात पूजा केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर देवस्थान व संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान येथे पुजा करून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर दोन्हींही मंदिरात आरती करण्यात आली. पुजेचे साहित्य, हार फुले आदी साहित्यांचे विक्रीची परवानगी देऊन छोट्या व्यवसायकांना दिलासा देण्याचे काम केले जाईल असे यावेळी श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

ब्रम्हगिरी, गंगाद्वार येथे पर्यटकांपेक्षा भाविकांची संख्या अधिक असते. हे लक्ष्यात घेऊन पर्यटन विभागाकडून आकारण्यात येणारा शुल्क रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. झिरवाळ यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलास मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज कान्नव, अरुण मेढे, भिकुशेठ बत्ताशे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, अमोल कडलग, लखन लिलके, संतोष पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, मारुती पवार, मोहन भांगरे, दिलीप पवार, योगेश तुंगार, कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, बाळू कदम, जितु झोले, दामोदर कडलग, पंढरी कडलग आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com