नारायण राणेंना दिलासा... धुळे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
Centre Minister Narayan Rane
Centre Minister Narayan RaneSarkarnama

धुळे : गेल्या वर्षी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मंगळवारी धुळे (Dhule court) जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी शिवसेना (Shivsena)नेत्यांनी मंत्री राणेंविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल केला होता.

Centre Minister Narayan Rane
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि धुळे जिल्ह्यासह शहरातही शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने केली होती. शिवाय, या प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी नरेंद्र परदेशी यांनी श्री. राणे यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मंत्री राणेंविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

Centre Minister Narayan Rane
दीपिका चव्हाण यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याची ५१ मिनीटे शिवीगाळ!

या प्रकरणी मंत्री राणे यांच्यातर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी ४ मेस धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर धुळे न्यायालयात मंगळवारी कामकाज झाले. या वेळी अ‍ॅड. निकम व सरकारी पक्षात जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षाने राणेंच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. मात्र, दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मंत्री राणे यांच्या बाजूने अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी काम पाहीले. त्यांना अ‍ॅड. गजानन शिंदे, अ‍ॅड. आनंद ताथेड यांचे सहकार्य लाभले.

भारतीय दंड संहितेची जी कलमं राणेंविरुद्ध लावण्यात आली आहेत ती सकृत दर्शनी चुकीची आणि बेकायदेशीर आहेत. राणे यांच्या वक्तव्यामुळे कुठल्याही समाजात तेढ निर्माण झाले नाही. त्याचबरोबर कुठलीही सामाजिक शांतता बिघडली नाही, असा युक्तिवाद राणे यांच्या वतीने करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कित्येक महिने धुळे पोलिसांनी कधीही राणे यांना चौकशीसाठी बोलविले नाही. जेव्हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला तेव्हा आम्हाला राणेंची चौकशी करायची आहे, असे सांगून हा अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com