नारायण राणेंनी प्रस्ताव मागितला अन् भाजप महापौरांना नारळ मिळाला!

भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत प्रशासक नियुक्तीचा आदेश निघाला!
Narayan Rane & Satish Kulkarni
Narayan Rane & Satish KulkarniSarkarnama

नाशिक : दोन दिवसांपूर्वी भाजपने अतिशय धावपळ करीत शहरासाठी आयटी प्रकल्पाची परिषद घेतली. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) उपस्थित होते. त्यांनी महापौरांकडे प्रस्ताव मागितला अन् दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या (NMC) आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. यानिमित्ताने महापौर सतीश कुलकर्णी (Satish kulkarni) यांना पदासह महापालिकेचे निवासस्थानही सोडावे लागल्याने भाजपला (BJP) हा मोठा राजकीय धक्का आहे.

Narayan Rane & Satish Kulkarni
एलबीटीच्या नावाखाली धुळे महापालिकेत खंडणी वसुली!

नाशिक महापालिकेच्या निर्वाचीत सदस्यांची मुदत येत्या १५ मार्चला संपुष्टात येत आहे. कोरोना तसेच प्रभागरचनेची प्रक्रीया यामुळे निवडणुका वेळेवर होण्यात अडथळे आले. त्यामुळे त्याचा फटका नगरसेवकांना बसला आहे. राज्य शासनाने महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निवडणुका विहित वेळेत होत नसल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत हाकला जाणार आहे.

Narayan Rane & Satish Kulkarni
OBC : आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ; छगन भूजबळ ठाम

महापालिकेचे विद्यमान आयुक्त कैलास जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे विश्वसनिया सुत्रांनी सांगितले. नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. १४ मार्चपासून ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आयुक्त कैलास जाधव त्याचे कामकाज बघतील. विहित वेळेत महापालिका निवडणूक होत नसल्याने अखेर महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. त्याने भारतीय जनता पक्षाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून महापौरांसह लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत रीतसर नोटीस काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. लवकरच महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याचाही ताबा मनपा प्रशासन घेणार आहे.

राणेंना मिळाले होते संकेत

दोन दिवसांपूर्वी भाजपने गेले काही दिवस महत्त्वांकांक्षी प्रकल्प म्हणून सातत्याने घोषणा केली होती, त्या माहिती तंत्रज्ञान पार्कबाबत विविध प्रयत्न सुरु होते. त्याचा त्यांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देखील फायदा घ्यायचा होता. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे शहरात आले. मात्र महापालिका आयुक्त त्यांच्या स्वागतालाही गेले नाही. एव्हढेच नव्हे तर महापालिकेच्या या कार्यक्रमाला महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, हे सुचक होते. या कार्यक्रमात राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव द्या मी लगेच मंजूर करतो, असे सांगितले अन् दुसऱ्याच दिवशी भाजप महापौरांना नारळ मिळाले, याचीच अधिक चर्चा आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com