विजय गावितांना धक्का ; पुतण्या पराभूत, शिवसेनेचे राम रघुवंशी विजयी

शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena Ram Raghuvanshi) यांचा विजय झालेला आहे भाजपचे पंकज गावित यांना त्यांनी पराभूत केले आहे.
vijay gavit
vijay gavitsarkarnama

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने येथील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी कोपर्ली गटातील निवडणूक शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena Ram Raghuvanshi) यांचा विजय झालेला आहे भाजपचे पंकज गावित यांना त्यांनी पराभूत केले आहे. राम चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्षपदी होते ओबीसी आरक्षणामुळे पद रद्झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कोपरली गटातून विजय मिळविला आहे. अँड. राम चंद्रकांत रघुवंशी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आहे. पंकज गावित हे विजय गावित यांचे पुतणे आहेत.

भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली होती. त्या सुप्रिया गावित (Supriya Gavit) या 1326 मतांनी विजयी झाल्या आहेत.

vijay gavit
राहुल गांधींना झटका ; वायनाडमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com