ZP Election : नंदुरबारमध्ये सत्ता राखली, पण शिवसेनेचं उपाध्यक्षपद धोक्यात

नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी कोपर्ली गटातील निवडणूक शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena Ram Raghuvanshi) यांचा विजय झालेला आहे भाजपचे पंकज गावित यांना त्यांनी पराभूत केले आहे.

 
ZP Election : नंदुरबारमध्ये सत्ता राखली, पण शिवसेनेचं उपाध्यक्षपद धोक्यात
Nandurbar ZP Electionsarkarnama

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांचे निकाल घोषित झाले आहेत. यात शिवसेना काँग्रेसची सत्ता कायम राहिल, असे चित्र आहे. शिवसेनेच्या उपाध्यक्षपद मात्र धोक्यात आले आहे. यात काँग्रेसचे 3, भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी कॉग्रेसचा १ जागांवर विजय मिळविला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाची मानली जाणारी कोपर्ली गटातील निवडणूक शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena Ram Raghuvanshi) यांचा विजय झालेला आहे भाजपचे पंकज गावित यांना त्यांनी पराभूत केले आहे.

Nandurbar ZP Election
ZP Election : अकोला, वाशिमचे निकाल घ्या जाणून...

राम चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्षपदी होते ओबीसी आरक्षणामुळे पद रद्झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कोपरली गटातून विजय मिळविला आहे. अँड. राम चंद्रकांत रघुवंशी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आहे. पंकज गावित हे विजय गावित यांचे पुतणे आहेत.

भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली होती. त्या सुप्रिया गावित (Supriya Gavit) या 1326 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपला रणाडा गटातून शिवसेनेचा आणखी एक उमेदवार विजयी झाला. शिवसेनेच्या शकुंतला शिंत्रे यांनी 1373 मतांनी विजयी मिळवला. त्यांनी भाजपच्या रिना पांडुरंग पाटील यांचा पराभव केला. भाजपसाठी नंदुरबारमध्ये हा दुसरा धक्का आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या १८ गट व पंचायत समितीच्‍या १४ गणांसाठी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत १८ गटांसाठी ३५ उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी (ता.५) झालेल्‍या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे निकाल आतापर्यंत घोषित झाले आहेत. या निकालावरून जिल्हा परिषदेतील शिवसेना– काँग्रेसची सत्ता कायम असणार असल्‍याचे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. शनिमांडळ गटातून शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे 518 मतांनी विजयी झाल्‍या आहेत.

Related Stories

No stories found.