`साहेब, आम्ही गद्दार नाही, तुम्हाला सोडून जाणार नाही`

आमदार आमश्‍या पाडवी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ग्वाही, साडेसात हजार शपथपत्र सादर
Uddhav Thakrey with Nandurbar Shivsena leaders.
Uddhav Thakrey with Nandurbar Shivsena leaders.Sarkarnama

शहादा : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केल्याने नंदुरबारला (Nandurbar) शिवसेनेला (Shivsena) धक्का बसला होता. मात्र ही उणीव सोमवारी आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांनी साडे सात हजार कार्यकर्त्यांचा पाठींबा सादर करून भरून काढली. आता शिवसेना तळागाळात रूजविण्याचे काम करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. (MLA Amshya Padvi submits seven thousand support letters To Uddhav Thakrey)

Uddhav Thakrey with Nandurbar Shivsena leaders.
पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नव्हे... उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

साहेब, आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेने सोबतच राहू, आम्हाला पदाची लालसा नाही, शिवसेना आमचा प्राण आहे. पक्ष संकटात असताना सोडून जाणे, ही पक्षासोबत गद्दारी असून हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गद्दारी करणे शिकवले नसून स्वाभिमानाने ताठ मानाने जगणे शिकविले आहे, अशा शब्दात आमदार आमश्‍या पाडवी यांनी शेकडो शिवसैनिकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेत ग्वाही दिली.

Uddhav Thakrey with Nandurbar Shivsena leaders.
Pankaja Munde| पंकजा मुंडे अजूनही नाराज आहेत का?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार पाडवी व जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात भेट घेतली. यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही पक्षाशी गद्दारी करणार नाही, अखेरच्या श्वासा पर्यंत पक्षप्रमुख ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेशी एकनिष्ठ राहू अशा आशयाचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील ५ हजार तर शहादा विधानसभा क्षेत्रातील अडीच हजार असे सुमारे साडेसात हजार शपथपत्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भेट स्वरूपात दिले.

यावेळी श्री ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, विधान परिषद सदस्य सचिन अहीर, धुळे -नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनीही नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांची चर्चा करून त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके, माजी जिल्हा उपप्रमुख सुनील सोनार, माजी नगरसेवक विनोद चौधरी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, जगदीश चित्रकथी, अक्कलकुवा तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, कुलदीप टाक, नरेंद्र जोशी, शाकीब पठाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com