`या` शहरात गुन्हेगार पोलिसांना थरथर कापतात, शिक्षेचे प्रमाण आहे ९२.१३ टक्के!

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी तपासी अंमलदारांचा सत्कार केला.
Police honored at Nandurbar
Police honored at NandurbarSarkarnama

नंदुरबार : पोलिस (Nandurbar Police) महासंचालकांनी २०२१ मधील राज्यातील पोलिसांचे दोषसिद्धी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले असता, नंदुरबार जिल्हा पोलिस दलात गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण ९२.१३ टक्के असल्याने राज्यात नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला आहे. तसे पत्र पोलिस मुख्यालयाला प्राप्त झाले आहे. (Nandurbar got first rank in Crime investigation)

Police honored at Nandurbar
रावेरचे केळी उत्पादक म्हणाले, धन्यवाद ठाकरे सरकार!

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे तपास वेळेत व उत्कृष्ट करणे, वॉरंट बजावणीबाबत पोलिस ठाणे, प्रभारी व संबंधित अंमलदारांनी दैनंदिन आढावा घेणे, पोलिस अधिकारी, अंमलदार व सरकारी वकिलांनी साक्षी अगोदर एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवणे, पोलिस साक्षीदार व तपास अधिकाऱ्यांची रोज मुलाखत घेणे, उत्कृष्ट तपास व गुन्हे सिद्ध झाल्यास प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्रवाटप करणे, या अनुषंगाने गुन्हेदोष सिद्ध करण्यासाठी नियोजनबद्ध कामकाज करण्यात येत आहे.

Police honored at Nandurbar
पोलिसांच्या नोटीसने मावळते महापौर सतीश कुलकर्णी संतापले!

कोर्ट कमिटमेंट उपक्रम

वॉरंट बजावणीत सरकारी वकील, पोलिस अधिकारी, कोर्ट पैरवी अंमलदार यांच्यात समन्वय साधला जातो. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील जामीनपात्र वॉरंट, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी प्रभावीपणे व परिणामकारक झाल्यामुळे न्यायालयात हजर राहण्याचे प्रमाण वाढल्याने कमी कालावधीत खटल्यांचा निकाल लागत आहे. साहजिकच गंभीर गुन्ह्यातील संशयितांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. न्यायालयात दुभाषिक अंमलदार, आदिवासी समाजबांधव न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर असतात. नंदुरबार जिल्हा पोलिस दलात वॉरंट अद्ययावत व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप अतिशय उपयुक्त असून, गंभीर गुन्ह्यातील संशयितांना जामीन मिळत नाही.

खटल्यांची बैठक

जिल्हास्तरावर अपर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा सरकारी वकिलांचे न्यायालयीन निकालासंदर्भात जबाबदारी निश्चितीसाठी सनियंत्रण समिती बैठकीत खटल्यांचे अवलोकन करण्यात येते. तपास अधिकारी, सरकारी वकील किंवा सरकारी साक्षीदारांच्या चुकीमुळे खटला सिद्ध न झाल्यास त्यांच्याविरुद्ध कसुरी अहवाल सादर करण्यात येतो आणि तसा सविस्तर तिमाही अहवाल पोलिस महासंचालकांना सादर करण्यात येतो. दोष सिद्ध झालेल्या खटल्यात तपास अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीसही देण्यात येतात.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com