मंत्री दादा भुसेंच्या सूचनांना नाफेडकडून केराची टोपली

केंद्रीय राज्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या सूचना अधिकारी ऐकेना
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : नाफेडच्या (NAFED) माध्यमातून खरेदी केलेल्या दोन लाख ३८ हजार टन कांद्या (Onion) खरेदिचा चौकशी अहवाल जिल्हा प्रशासनाने पीएमओ पोर्टलवर अपलोड करावा, (PMO Portal) अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.) यांना देण्यात आल्या. (Onion purchaes and sale issue may turn in serious mode)

Dada Bhuse
भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन ऐतिहासीक क्षणांचे साक्षिदार व्हा!

मात्र, अद्याप नाफेडच्या भाऊसाहेबांनी जिल्हा यंत्रणेच्या समितीला काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. निफाड प्रांत अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीला नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी कांदा खरेदीची कागदपत्र देण्यास नकार देत केराची टोपलीच दाखवली.

Dada Bhuse
Important: टोलनाक्यावर ७ मिनिटांची मुदत, अन्यथा टोल देऊ नये?

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. बैठकीत केंद्र सरकारच्या पैशांतून नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली होती.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्यासह काही आमदारांनी नाफेडच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत याठिकाणी सुरू असलेल्या अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी नाफेडचे अधिकारीच उपस्थित नव्हते. याबाबत भुसे व पवार यांनी

संताप व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे ठरले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी निफाड प्रांत, कृषी पणन अधिकारी, बाजार समिती सचिव यांची चौकशी समिती गठित केली होती.

या समितीने तत्काळ नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांची भेट घेत कांदा खरेदीची कागदपत्र व माहिती देण्यास सांगितले. पण शैलेंद्र कुमार यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना अशी माहिती मला तुम्हाला थेट देता येणार नसल्याचे सांगत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले.

त्यानंतर समितीने आवश्यक असलेली माहिती मिळावी, यासाठी नाफेडला पत्र दिले. या पत्रानुसार आठ दिवसांच्या आत माहिती मिळणे अपेक्षीत असताना पंधरवडा उलटल्यानंतरही माहिती समितीला प्राप्त होवू शकली नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in