Eknath Khadse : खडसेंचं विधान, चर्चेला उधाण; म्हणाले, "गिरीश महाजनांना..."

Girish Mahajan : परिसराचा विकास होण्यासाठी दुश्मनाच्याही पाठिशी राहणार
Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama

Maharashtra Political News : सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावे म्हणून मीच बाळासाहेबांकडे शिफारस केली होती. माझा कट्टर दुश्‍मन असला तरी चालेल मात्र आपल्या भाग सुजलाम सुफलाम होण्यासाठी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आपला पाठीबा असेल, असे मत राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.

Eknath Khadse, Girish Mahajan
MP Rajani Patil : मोठी बातमी! खासदार रजनी पाटील यांचं निलंबन; कारण काय?

राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळी एकाच पक्षात होते. भारतीय जनता पक्षात (BJP) असतांना ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पक्षांतर्गत वादात दोघांचे बिनसले.

खडसे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे दोघे आता एकमेकांचे कट्टर शत्रु झाले आहेत. दोघेही एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतांनाही आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील आपला पाठींबा राहिल, असे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

Eknath Khadse, Girish Mahajan
Shivsena News : 'या' मुद्यावरून शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार; दिला थेट इशारा

पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, सुरेशदादा जैन (Suresh Jain) मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मला कार्यक्षम दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे आहे, असे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackerey) यांच्याकडे व्यक्त केले होते. आता याच निकषात जर आता गिरीश महाजन (Girish Mahajan) बसत असतील तर मला त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीही कोणतीही अडचण नाही.

Eknath Khadse, Girish Mahajan
Amol Kolhe : मी स्टार प्रचारकांत आहे का? आताच कळलं; कोल्हेंच्या विधानाने पुन्हा भुवया उंचावल्या

सुरेश जैन यांना दिला तसाच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनादेखील माझा पाठिंबा राहिल. माझ्या भागाचा विकास व्हावा, हीच आपली अपेक्षा आहे. परिसरात विद्यापीठ पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठीचा निधी मिळावा व आपला परिसर सुजलाम सुफलाम होण्यासाठी माझा कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील, असे मतही खडसेंनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com