
Bachchu Kadu on Sharad Pawar's Memory: कोणी कानात येऊन सांगते, कोणी मी गराड्यात असताना काहीही मागणी करतात, अहो हे सर्व लक्षात ठेवायला मी काय शरद पवार आहे काय?. काहीही लक्षात ठेवायला माझी स्मरणशक्ती शरद पवार यांच्यासारखी तल्लख नाही, असे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे सांगितले.
श्री. कडू यांचे आगमन झाल्यावर विविध दिव्यांगांनी त्यांना गराडा घातला. यावेळी त्यांच्याकडे विविध मागण्या, अडचणी सांगण्यासाठी त्यांची ही गर्दी पाहिल्याव मेळ्यात ते म्हणाले, मी आलो की तुम्ही सगळे गर्दी करता. कोणी कानात काही तरी सांगते. कोणी गर्दीत सतत काही चरी अडचणी मांडतात. हे सर्व मी लक्षात ठेऊ तरी कसा. हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी माझी स्मरणशक्ती शरद पवार यांच्यासारखी नाही, असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे कौतुक केले.
ते म्हणाले, मी गुवाहाटीला गेलो होतो. तिकडून परतल्यावर सगळे मला विचारत होते, किती खोके घेतले?. परंतू मीकाही खोके घेतले नाही. मला गुवाहाटीला जाण्याबाबत फोन आला होता. तेव्हा मी त्यांना, स्वतंत्र दिव्यांग विभाग तयार करावा अशी एकच अट टाकली होती. ती त्यांनी मान्य केली. आता दिव्यांगांसाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग तयार झाला आहे.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री दिव्यांग मंत्रालयाला निधीची कमतरता पडू देणार नाहीत. आता आपल्यावर जबाबदारी आली आहे. आपण कसा पाठपुरावा करून प्रश्न सोडवून घेतो. अन्यथा संधी मिळाली आहे. त्याचा लाभ घेता आला नाही तर हा सर्व खटोटाप काहीच उपयोगी पडणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.