माझे जीवन सापसिडीच्या खेळासारखे, लिहीले तर चार हजार पानांचे पुस्तक होईल!

नाशिकचे साहित्य संमेलन यशस्वी झाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले- पाटील (Kautikrao Thale-Patil) यांनी ‘अक्षरयात्रा’ या नियतकालिकातून नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या (Literature convention) आयोजकांवर टीका केली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. तो अद्याप संपलेला नाही. याबाबत स्वागताध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
भुजबळांची भारणेंना साद, तुमचा आमचा एक आवाज!

या संदर्भात संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी, एवढे सगळे झाल्यावर अजूनही खटपट सुरूच आहे. या खटपटीवर आणि झालेल्या टीकेवर लक्ष देत नसल्याचे वक्तव्य केले आहे.

Chhagan Bhujbal
मंजुळा गावितांनी मतदारसंघासाठी आणला ६१.७४ कोटींचा निधी!

श्री. भुजबळ म्हणाले, मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झालेल्या संमेलनाचे नाशिककरांच्या प्रेमामुळे, मदतीमुळे यशस्वी नियोजन करू शकलो. नाशिकच्या संमेलनावर कितीही टीका झाली, कोणी कितीही अन्‌ काहीही बोलले, तरी हे संमेलन पुढील अनेक वर्ष साहित्यिक विसरणार नाहीत.

दरम्यान, लहानपणी झोपडपट्टीतले जीवन, शाळा-कॉलेजचे जीवन, त्यानंतर जीवनातील चढ-उतार, दहा बाय दहा पत्र्याच्या खोलीत राहणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला, हे काही कमी नाही. असंख्य लढाया खेळल्या असून, १९९१ पासून मधला काही काळ सोडला, तर सतत मंत्रिपदावर आहे. सापसिडीच्या खेळाप्रमाणे जीवन झाले असून, लिहायला घेतले तर जवळपास चार ते पाच हजार पानांचे पुस्तक होईल, असेही त्यांनी नमूद केले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com