डाॅ. भारती पवार म्हणाल्या, `मविप्र` संस्थेने मला घडवले!

पाळे येथे जनता विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
डाॅ. भारती पवार म्हणाल्या, `मविप्र` संस्थेने मला घडवले!
Dr Bharti Pawar, Nilimatai Pawar & Other leadersSarkarnama

कळवण : आपण स्वतः मविप्र संस्थेत (Maratha Vidya prasarak sanstha) शिक्षण घेतले असून, प्राथमिक शिक्षणापासून ते वैद्यकीय शिक्षणापर्यंतच्या जडणघडणीत मविप्र संस्थेचा सिंहाचा वाटा (major role) आहे. माझी जडण घडण या संस्थेच्या शिक्षणाच्या माध्यमातून झाली. सर्वांनी बदलत्या काळानुसार बदलून शिक्षणात नवनवीन प्रयोग झाल्यास नवीन पिढी अधिकाधिक सक्षम होणार असून, शैक्षणिक क्षेत्रात मविप्र संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी काढले.

Dr Bharti Pawar, Nilimatai Pawar & Other leaders
आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

पाळे (ता. कळवण) मविप्र संस्था संचलित जनता विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.

Dr Bharti Pawar, Nilimatai Pawar & Other leaders
फडणवीसांनी ओबीसी, मराठ्यात लावली भांडणे

संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार म्हणाल्या, मविप्र संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असून, आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले, मविप्रने लौकिकाला साजेसे काम करून आगामी काळात उत्कृष्ट दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत.

डॉ. तुषार शेवाळे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. प्रास्ताविकात संचालक अशोक पवार यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात कळवण तालुक्यातील मविप्र शाखेसाठी इमारती सुसज्ज केल्याचे सांगितले. राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले. चिटणीस सुनील ढिकले यांनी आभार मानले.

यावेळी सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, मविप्र संचालक अशोक पवार, नाना महाले, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, दत्तात्रेय पाटील, प्रल्हाद गडाख, हेमंत वाजे, डॉ. विश्राम निकम, माजी संचालक रवींद्र देवरे, नारायण हिरे, देविदास पवार, शिक्षणाधिकारी डॉ. सी. डी. शिंदे, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. एस. जे. कोकाटे उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.