गिरीश महाजनांच्या सहकाऱ्यालाही अटकेपासून संरक्षण!

‘मविप्र’ वाद प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कामकाज सुरु आहे.
Police logou
Police logouSarkarnama

जळगाव : ‘मविप्र’ वाद प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (High court) खटल्याचे कामकाज सुरु आहे. न्यायालयाने आज भोईटे गटाचे प्रमुख तत्कालीन मानद सचिव ॲड. तानाजी केशवराव भोईटे (Tanaji Bhoite) यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. वयोवृद्ध असल्याने इतर संशयीतांप्रमाणे त्यांनाही अटकेपासुन संरक्षण मिळण्यासाठी दाखल अर्जावर सरकार पक्षाने २४ जानेवारी पर्यंत अटक न करण्याची ग्वाही दिल्याने न्यायालयाने सरंक्षण प्रदान केले आहे.

Police logou
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन गटांमधील वादात ॲड. विजय भास्कराव पाटिल यांना धमकावल्या प्रकरणी कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात कामकाज सुरु आहे. यामध्ये आज मुख्य संशयित तसेच तत्कालीन संचालक ॲड. तानाजी केशवराव भोईटे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

Police logou
राज ठाकरेंचा राज्यात दबदबा, मात्र `या`मुळे धुळ्यात इंजिन साईडींगला!

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी (२०१८) मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात (९ डिसेंबर) रोजी माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

यांच्यावर मकोका..

त्यानंतर २९ संशयित पैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भोईटे व शिवाजी केशव भोईटे अशा नऊ संशयीतांच्या विरुद्ध ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले होते.

यात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी भोईटे गटाचे प्रमुख तानाजी भोईटे यांना अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना म्हटले की, या गुन्ह्यात आधीच संशयितांना अटकेपासून संरक्षण नाही तसेच भोईटे हे वयोवृद्ध जीवन जगत आहे तर गुन्हा देखील उशिराने दाखल झाला आहे. परिणामी इतर संशयितांनी प्रमाणे तानाजी भोईटे यांना देखील अटकेपासून संरक्षण मिळावे असे अॅड.अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. त्यावर सरकार पक्षाने देखील (ता.24) पर्यंत अटक करणार नाही अशी हमी न्यायालयात दिली. त्यामुळे त्यानुसार आज न्यायालयाने इतरांप्रमाणे भोईटे गटाचे प्रमुख तानाजी भोईटे यांना देखील अटकेपासून संरक्षण दिले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in