MVA News : शुभांगी पाटलांच्या उमेदवारीवरुन आघाडीत बिघाडी? काँग्रेसचं ठरलं पण राष्ट्रवादी तळ्यात मळ्यात...

Nashik Graduate Election News : ...यानंतर पाठिंबा द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
ajit pawar, shubhangi patil, nana patole
ajit pawar, shubhangi patil, nana patoleSarkarnama

NCP News: नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजप आणि काँग्रेसनं अधिकृत उमेदवार न दिल्यानं आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. पण आता एकीकडे भाजप तांबे यांना पाठिंबा देणार का हा सस्पेन्स कायम ठेवला असतानाच पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन महाविकास आघाडीतही मतभेद असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. आता पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. मात्र, एकीकडे त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेतली आहे. (Nashik Graduate Election News)

ajit pawar, shubhangi patil, nana patole
Saroj Ahire News: अमेरिकावारी करणाऱ्या तहसीलदार अहिरराव यांच्यावर गंभीर आरोप!

नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, यानंतरही उमेदवारीबाबत उद्या अंतिम निर्णय घेऊ अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांनी मांडली.बुधवारी (दि.१८) महाविकास आघाडीच्या (MVA) प्रमुख नेत्यांची बैठक आय़ोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

ajit pawar, shubhangi patil, nana patole
Satyajeet Tambe यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार, त्यांना पदावरून हटवा !

अजित पवार म्हणाले, नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंशी बोलणं झालं आहे. शरद पवार यांनीही काही नेत्यांशी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असेल? याबाबत आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. सुधीर तांबे तीन वेळेस येथून निवडून आलेले आहेत. तांबे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत सुधीर तांबेच स्पष्टपणे सांगू शकतात. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळेच या जागेबाबत पेच निर्माण झाला आहे.

मात्र, उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसची भूमिका जाणून घेत आणि ठाकरे गटाशी चर्चा करुन याबाबत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही पवार यांनी यावेळी सांगितले.

याची जराशी कुणकुण लागली होती...

सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कदाचित त्यांच्या घरी काही चर्चा झाली असेल. त्यानंतर शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला असेल. मला याची जराशी कुणकुण लागली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी हे लक्षातही आणून दिले होते. काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. तसेच, काँग्रेसने एक डमी अर्ज भरुन ठेवावा अशीही सूचना केली होती.

जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला पाठिंबा...

जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाईल. शुंभागी पाटील यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांच्याकडे जिंकून येण्याची क्षमता आहे, असे सध्या तरी चित्र आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करायचा की नाही, हे उद्या निश्चित होईल. तसेच, सुधीर तांबे यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्यांची बाजू समजून घेता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com