
नाशिक : शहरातील (Nashik) अनेक मुस्लिम (Muslims) युवक शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करीत आहेत. नाशिक रोड व अशोका मार्ग परिसरातील मुस्लिम समाजातील अनेक तरुणांनी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेचा भगवा हातात घेतला. महापालिका निवडणुकीच्या (NMC) पार्श्वभूमीवर अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला त्याचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. (Many Muslim youth joins Shivsena on the eve of NMC election)
पक्षाच्या शालिमार कार्यालयात नुकताच मुस्लिम युवकांच्या प्रवेश सोहळा झाला. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर आदीच्या उपस्थितीत उस्मान खान, अजीज शेख, विक्की वाघ, मुजाहिद शेख, मोईन शेख, शोएब शेख, अरबाज शेख, फरहान सय्यद, अयाझ शेख, सलमान शेख, शेहबाज शेख, तारीफ मेमन यांच्यासह अनेक मुस्लिम तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नीलेश गांगुर्डे, महेश बडवे, सुभाष गायधनी, मंगला भास्कर, शोभा गटकळ, रमेश उघडे, नीलेश साळुंखे, सुयश पाटील, स्वाती पाटील, फैमिदा रंगरेज, द्वारका गोसावी, शोभा दिवे, श्रध्दा कोतवाल, कीर्ती जवखेडकर, उषा गायखे, मिलिंद देशमुख, शिवाजी दाते, आशिष शिंदे, हर्षल गांगुर्डे, संपत वाघ, प्रकाश वाघ, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.
शहरात शिवसेनेने आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी मनापासून कामाला लागले आहेत. त्यामुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने त्यांना मोठे आव्हान उभे केले आहे. या युवकांनी प्रवेश केल्याने त्याचा शिवसेनेला किती राजकीय लाभ होतो, याची उत्सुकता आहे.
शिवसेना सर्व जाती- धर्माचा आदर बाळगते. समाजातील सर्व घटकांचा विकास हाच या पक्षाचा ध्यास असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवसेनेचे विचार पटत असल्याने मुस्लिम समाजातील युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने आगामी निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येईल.
- बबन घोलप, शिवसेना उपनेते
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.