हनुमान जयंती मिरवणुकीवर फुले उधळत मुस्लीमांनी केले जंगी स्वागत!

मुस्लीम बांधवांनी मशीदीसमोर शोभायात्रेतील स्वामी सोमेश्‍वरानंदांचा सत्कार केला.
हनुमान जयंती मिरवणुकीवर फुले उधळत मुस्लीमांनी केले जंगी स्वागत!
Muslims welcome Hindu mahants.Sarkarnama

नाशिक : राजकीय (Politics) नेते मशीदीवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा या वादात व्यस्त असताना नाशिकच्या (Nashik) धार्मिक नेत्यांनी मात्र या नेत्यांना चांगलीच चपराक लगावली. हनुमान जयंतीची मिरवणूक मशीदीसमोर आली असता त्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव (Throw Flowers for welcome) करण्यात आला. रथावरील महंतांना खाली उतरवून त्यांचा महावस्त्र देऊन सत्कार करीत, `हिंदू मुस्लीम भाई भाई, हम सब एक है` अशा घोषणा देऊन बंधुभावाचा आदर्श घडवला.

Muslims welcome Hindu mahants.
राज ठाकरे फसले; मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही!

आपण सर्व भारतीय प्रथमतः एक आहोत. जगात मानवता धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असून तो सतत जागृत राहावा, असे प्रतिपादन बेझे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील श्री पंचायती निरंजन आखाडाप्रणीत श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्वर स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी केले.

Muslims welcome Hindu mahants.
मशिदीजवळ भोंगे लावाल तर ४ महिने जेल अन् तडीपारी!

श्रीराम शक्तिपीठातर्फे दरवर्षी श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. शोभायात्रेचे हे आठवे वर्ष आहे. ही यात्रा भद्रकालीतील दुध बजार मशीदीसमोर आली असता शोभायात्रेचे मुस्लीम बांधवांनी जंगी स्वागत केले.

हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी वाकडी बारव येथून सायंकाळी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. शोभायात्रेचे हाजी युनूस तांबोळी आदी मुस्लिम बांधवांतर्फे दरवर्षी यात्रेचे स्वागत करून स्वामी सोमेश्‍वरानंद यांचा सत्कार करण्यात येतो. आजही हाजी युनूस तांबोळी, हाजी युनूस आदी मुस्लिम बांधवांनी यात्रेचे स्वागत करून स्वामींचा हार घालून सत्कारही केला. दोन्ही धर्मातील कोणाचाही सण असो, त्याद्वारे धर्माधर्मातील विश्‍वास वाढावा, जेणेकरून सामाजिक शांतता अबाधित राहाते, असे मत हाजी तांबोळी यांनी व्यक्त केले. यावर स्मावी सोमेश्‍वरानंद यांनीही संविधानाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भाऊ- भाऊ म्हणून राहात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी दोन्ही धर्माच्या प्रतिनिधींनी एकमेकांची गळाभेट घेत, हम सब एक है, हिंदू-मुस्लीम भाई भाई अशा घोषणा दिल्या.

यात्रेत हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक रामसिंग बावरी यांच्यासह महाराजांचे जिल्हाभरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी असलेली श्री हनुमानाची पंधरा फुटी भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी सहा वाजता वाकडी बारव येथून शोभायात्रेला सुरवात झाली. ‘जय श्रीराम’, ‘रामभक्त हनुमान की जय’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दूध बाजार चौकातील प्राचीन श्री पंचदेव गणेश मंदिरात महाराजांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना स्वामी सोमेश्‍वरानंद यांनी सर्वच धर्माचा प्रचार, प्रसार व्हावा. परंतु त्यासाठी वातावरण निकोप असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शोभायात्रेत हनुमान चालिसाचे अखंड पठण चालू होते. शोभायात्रेत भद्रकाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.