मुस्लिम बांधवांचे चर्चमध्ये नमाज पठण

नाशिक येथे इफ्तार पार्टीनंतर चर्चमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
Muslim praying in Church
Muslim praying in ChurchSarkarnama

नाशिक : होली क्रॉस चर्चमध्ये (Holy cross church) झालेली इफ्तार पार्टी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. सर्वधर्मीय बांधवांनी या ठिकाणी एकत्र येत केवळ रोजा इफ्तार केला नाही, तर चर्चमध्ये मुस्लिम (Muslim) बांधवांनी नमाज पठण करत ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी हैं हम हिंदुस्तान हमारा’ वाक्याचा प्रत्यय आणून देत सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवून आणले.

Muslim praying in Church
गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

त्र्यंबक सिग्नल येथील हॉली क्रॉस चर्चमध्ये रमजाननिमित्त बुधवारी (ता.२०) सायंकाळी एम्स चॅरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही नाशिक संविधान प्रेमी यांच्यातर्फे बंधुभाव इफ्तार मिलन-२०२२’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन यासह विविध धर्माचे बांधव एकत्र आले होते.

Muslim praying in Church
दीपक पांडेचे उपक्रम नाशिकमध्ये पुढे सुरु राहणार!

सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने रोजा इफ्तार केला. सायंकाळी नमाजला जास्त वेळ नसल्याने उपस्थित मुस्लिम बांधवांना मशिदीत जाणे शक्य नव्हते. अशा वेळेस त्यांनी चर्चमध्ये असलेली एखादी खोली नमाजासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती चर्चचे फादर यांना केली. सर्वधर्मसमभाव आहे मग खोली कशाला सरळ चर्चमध्ये नमाज पठण करा, असे म्हणत त्यांनी चर्चमध्ये नमाजची व्यवस्था करून दिली.

मुस्लिम बांधवांनी चर्चमध्ये नमाज पठण केली. धार्मिक सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही इफ्तार पार्टी ठरली. मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना त्या ठिकाणी देव देवता, अल्ला, प्रभू येशू तसेच अन्य समाजाचे देव-देवता यांचे प्रत्यक्ष वास्तव्य चर्चमध्ये आल्याचा अनुभव अनुभवास मिळाला, अशा प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आल्या. सध्याच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दूषित वातावरणात अशाप्रकारे एकतेचा संदेश देणारी ही इफ्तार पार्टी समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

विविधतेतून भारत देश नटलेला आहे. त्यामुळे सर्वांनी एकतेची भावना मनात ठेवून वावरावे, अशा प्रकारचा संदेशदेखील उपस्थित सर्वधर्मीय बांधवांनी दिला.

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण होता. चर्चमध्ये इफ्तार पार्टी करत नमाज पठण करणे, त्यास सर्व धर्म बांधवांची उपस्थिती, समाजात तेढ निर्माण करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारी होती.

- किरण मोहिते, भारतीय हितरक्षक सभा

---

माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हा आमचा धर्म आहे. ते यानिमित्त अनुभवास मिळाले. याचा मला आनंद आहे. सर्वधर्मीय देवदेवतादेखील आनंद व्यक्त करत असतील, असे मला वाटते.

- फादर वेन्सी डिमेलो

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com