Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporationSarkarnama

Dhule BJP news : कचऱ्याची नव्हे भाजपच्या कारभाराची दुर्गंधीच जास्त!

भाजपच्या महापौरांच्या सुचनेला केराची टोपली, अधिकाऱ्यांची मात्र मनमानी

Dhule BJP news : धुळे महापालिकेचा कारभार कचरा व स्वच्छतेचे कंत्राट आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथे भाजपची सत्ता असली तरी भाजपच्या महापौरांच्या सुचनेला केराची टोपली दाखविली जात आहे. भारतीय जनता पक्षातच महापालिका कारभारावरून ताणतणाव आहे. कचऱ्याच्या कंत्राटावरून सुरु झालेल्या या वादात शहरात कचऱ्यापेक्षाही महापालिकेच्या कारभाराचीच दुर्गंधी अधिक असल्याचे बोलले जाते. (BJP leaders and mayor disappointed on Health department`s decision)

धुळे (Dhule) महापालिकेत (Corporation) भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आहे. महापौरांसह विविध पदाधिकारी याच पक्षाचे आहेत. शहरात अस्वच्छता (Civic issues) असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

Dhule Municiple corporation
Suhas Kande News: अपात्रतेचा निकाल येणारच नाही...हे आहे कारण!

सूचनांना केराची टोपली

अवैध आरोग्य कार्यालयीन अधीक्षकपदावरून श्री. माईनकर यांना तत्काळ हटवा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी सूचना खुद्द महापौर प्रतिभा चौधरी, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी करूनही या सूचनेला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

महापालिकेने पुणेस्थित एका कंपनीला सात वर्षांसाठी तब्बल ५६ कोटी रुपयांचा कचरा संकलनाचा ठेका दिला आहे. चौदा महिन्यांच्या कार्यकाळात या ठेकेदार कंपनीने अनियमित व गैरकारभारातून आर्थिक लूट चालविली असल्याचे महापौर चौधरी यांनी केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे. हा ठेका आणि श्री. माईनकर यांच्या नियुक्तीचे काही कनेक्शन आहे का, याबाबत राज्य शासनाने चौकशी करावी, अशी मागणी महापालिका वर्तुळातून होऊ लागली आहे. त्यामुळे आयुक्तांपुढील अडचणीत वाढ होणे संभव मानले जाते.

Dhule Municiple corporation
Nashik BJP News: भाजप शहराध्यक्षपदासाठी महापालिका ठेकेदारांचे लॉबिंग?

महापालिका आरोग्य विभागात आस्थापनेवर नसलेले कार्यालयीन अधीक्षकपद निर्माण करून प्रशासनाने या कारभाराचे तीनतेरा वाजविल्याचे मानले जाते. यात आरोग्यविषयक कुठलीही शैक्षणीक पात्रता नसतानाही राजेंद्र माईनकर यांच्यासाठी खास अधीक्षकपदाची निर्मिती करण्यात आली. या नियुक्तीत प्रशासनाला इतके स्वारस्य का? त्यामागचे रहस्य काय, याचा शोध इतर अधिकारी, नगरसेवक घेऊ लागले आहेत.

श्री. माईनकर यांच्याबाबत उघडपणे तक्रार करत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी सूचना स्थायी सभापती सौ. कुलेवार यांनी दिली होती. आरोग्य कार्यालयीन अधीक्षकपद नसताना श्री. माईनकर यांच्या नियुक्तीत स्वारस्य काय, अशी विचारणा महापौर सौ. चौधरी यांनी प्रशासनाला केली होती. त्यावर आयुक्तांनी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवल्याचे चित्र दिसते. अशा काही तक्रारी झाल्या, की श्री. माईनकर लागलीच भाजपचे काही नेते, पदाधिकाऱ्यांच्या आड लपतात, असे महापालिका वर्तुळात बोलले जाते.

Dhule Municiple corporation
Chhagan Bhujbal News: कर्नाटकच्या मराठी भागात मुख्यमंत्र्यांनी प्रचार करणे योग्य आहे का?

महापौर, स्थायी समिती सभापतींनाही अधिकारी वर्ग जुमानत नसल्याचे गंभीर चित्र आहे. श्री. माईनकर यांचा अर्थाअर्थी आरोग्य विभागाशी काही संबंध नाही, आरोग्यविषयक कुठला कोर्स त्यांनी केलेला नाही, त्यांच्या नियुक्तीमुळे आरोग्य विभागात मोठी खदखद निर्माण झाल्याचे ठाऊक असूनही आयुक्त देवीदास टेकाळे गप्प का, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com