अहो मुनगंटीवार, सरकार बरखास्ती म्हणजे कठपुतळीचा खेळ आहे का?

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उत्तर दिले.
अहो मुनगंटीवार, सरकार बरखास्ती म्हणजे कठपुतळीचा खेळ आहे का?

Gulabrao Patil (Shivsena) & Sudhir Mungantiwar (BJP)

Sarkarnama

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच राज्य सरकार (Mahavikas Aghadi Government) बरखास्तकरूनच दाखवतो. बरखास्त केले नाही तर नाव बदलेन असा दावा केला होता. यावर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी श्री. मुनगंटीवार यांना चिमटा घेत, सरकार बरखास्त करणे म्हणजे कठपुतळीचा खेळा आहे का? असा प्रश्न केला आहे.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil (Shivsena) &amp; Sudhir Mungantiwar (BJP)</p></div>
भुसावळ पालिकेवर आजपासून भाजप आऊट, प्रशासक इन!

श्री. मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेली टिका आणि राज्य सरकार बरखास्त करण्याच्या टिका शिवसेनेच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही मुनगंटीवार यांचा नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला होता.

<div class="paragraphs"><p>Gulabrao Patil (Shivsena) &amp; Sudhir Mungantiwar (BJP)</p></div>
खडसे-पाटील हा तर जुना वाद, तो चर्चेतून सुटेल!

याबाबत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री मंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव येथे पत्रकार परिषदेत म्हणाले, मुनगंटीवार यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करणे हा कठपुतळीचा खेळ वाटतो का?. असा टोला लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनी हे. सरकार बरखास्त करून दाखवतो असा इशारा दिला होता. याबाबत श्री. पाटील म्हणाले की, एखाद्या राज्यातील सरकार बरखास्त करणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी फार मोठी कारणे असावी लागतात. सरकार बरखास्त करून दाखवतो हे त्यांचे वक्तव्य आहे. त्याबाबत मला काही अधिक भाष्य करता येणार नाही. मात्र सरकार बरखास्त करणे हा त्यांना कठपुतळीचा खेळ नाही वाटत असेल तर तसे नाही. हे मात्र मला निश्चित माहीत आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in