भुजबळांचे गडकरींना पत्र, मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करा!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : मुंबई आग्रा महामार्ग (Mumbai Highway) नाशिक (Nashik) ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे. (Chahgan Bhujbal wrote a leeter to Nitin Gadkari for six lane highway)

Chhagan Bhujbal
राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची कचरागाडीतून रवानगी!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती.

Chhagan Bhujbal
शिंदे गटाला मिळेना प्रतिसाद; नेत्यांची झाली कोंडी!

त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाश्यांचा वेळ यामध्ये जात आहे.

लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

पुढे म्हटले आहे की, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधीत कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com