BJP News: भाजप सत्तेत तरीही वीज खंडीत करण्याचे आदेश!

विरोधी पक्षात असताना वीजपुरवठा खंडीत करण्यास भाजपचा विरोध होता.
Power cut
Power cutSarkarnama

नंदुरबार : थकबाकीदार (Arrears) शेतकरी (Farmers) व ग्राहकांचा वीजपुरवठा (Electricity supply) खंडीत करण्याच्या मोहिमेस भाजपने (BJP) विरोधी पक्ष असताना आंदोलन करून विरोध केला होता. आता भाजप सत्तेत आहे. मात्र वीजपुरवठा कंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (BJP in Power but MSEDC ordered to cut ower connection)

Power cut
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयकांची थकबाकी वेळेत वसूल करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा. वीज देयक थकबाकी वसुली व ग्राहक सेवेत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा ,कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिला.

Power cut
Nashik News: भाजप हा सत्तापिपासू; त्याने जनतेवर महागाई लादली!

नंदुरबार मंडलातील अभियंता व अधिकाऱ्यांच्या ४ ऑगस्टला झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. जळगावचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे उपस्थित होते.

‘‘ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे बिल योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रिडींग घेताना फोटोंचा दर्जा सुधारणे तसेच अचूक कामकाज करण्यास सांगितले आहे. याकडे उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांनीसुद्धा लक्ष द्यावे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक तसेच पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके वेळेत भरण्यासाठी अभियंत्यांनी पाठपुरावा करावा. वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्याचे निर्देशही डांगे यांनी दिले. या बैठकीस नंदुरबार मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com