फडणवीस साहेब, आधी आमचा हक्काचा जीएसटी वेळेवर द्या!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला भुजबळांचे झणझणीत उत्तर.
Chhagan Bhujbal & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal & Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जीएसटीवर ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीएसटीचा परतावा सगळाच द्या ना. तुम्हाला दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार रखडला आणि एक महिन्याचा दिला तर दोन महिन्याचा पगार देणार नाही का? आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या, असा सवाल छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला. (Centre doing delayed maharashtra`s GST Refund)

Chhagan Bhujbal & Devendra Fadanvis
ठरले तर, महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच?

केंद्राकडे सगळा आमचा जो जीएसटी आहे. तो हक्क आहे. जो काही वीस - पंचवीस हजार कोटी रुपये गोळा करता तो आम्हाला देऊन टाका ठेवता कशाला असा रोखठोक सवालही त्यांनी फडणवीस यांना केला.

Chhagan Bhujbal & Devendra Fadanvis
१४ दिवसांत ७ खून, महिला पोलिसावरही हल्ला!

ते म्हणाले, केंद्राने जीएसटी सोडून द्यावा आणि आम्हाला सांगावं की, जीएसटी संपली तुम्ही सेलटॅक्स गोळा करा मग प्रश्न येणार नाही तुमच्याकडे बोट दाखवण्याचा. सेलटॅक्स ऐवजी जीएसटी गोळा करता ते पैसे राज्याला मिळाले पाहिजे. राज्यासाठी गोळा होतात. ५० रुपयाचे पेट्रोल सव्वाशे रुपये करायचे आणि दहा रुपये कमी करायचे हा कुठला न्याय. सगळे कपडे काढून घ्यायचे आणि लंगोट द्यायची आणि म्हणायचं हे घ्या.. अरे पण आमचे बाकीचे कपडे द्या ना असा उपरोधिक टोलाही छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला लगावला.

यासंदर्भात फडणवीस यांच्या ट्वीटनुसार, ३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह असलेली संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज १जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार.

श्री. फडणवीस म्हणाले होते, राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची 'ढकलगाडी' करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार?आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा!

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com