MPSC; सुखद; अवघ्या चार तासांत `एमपीएससी`ची गुणवत्तायादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गतिमान कामगिरीने उमेदवारांना सुखद धक्का
MPSC logo
MPSC logoSarkarnama

नाशिक : राज्य (Maharashtra) शासनाच्या सेवेतील पोलिस (Police) शिपाई, पोलिस नाईक, हवालदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर अवघ्या चार तासांतच इतक्या जलदगतीने आणि उमेदवारांना प्रतीक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) निवडयादी व सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली आहे. (MPSC given a pleasent shock by faster result to Police candidates)

MPSC logo
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्यासाठी विभागीय स्पर्धा परीक्षेतील एक हजार ३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरया कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली.

MPSC logo
Arvind Sawant : आजारपणावर केलेली टीका न शोभणारी; अरविंद सांवतांनी राज ठाकरेंना सुनावले

प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांची शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून शुक्रवारी त्वरित प्रस्तुत परीक्षेची तात्पुरती निवडयादी व सर्वसाधारण गुणवत्तायादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.

उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी १६ एप्रिलला पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल ९ जूनला जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे ३० जुलैला मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण एक हजार ३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.

विकल्पासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत

परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेन्यूमध्ये ‘Post Preference/Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक ३ डिसेंबरला दुपारी बारापासून १० डिसेंबरला २३.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. ऑनलाइन पद्धतीशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब/ निवेदने/पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

---

महाराष्ट्रातील उमेदवारांचा राज्यातच नव्हे, तर केंद्रीय सेवेत अधिकचा टक्का असावा, या दृष्टीने आम्ही सर्व सदस्य प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी अभ्यासक्रम, परीक्षापद्धत व अन्य बदल केले आहेत व अजून करणार आहोत. या परीक्षेचा निकाल म्हणजे विश्‍वास अन्‌ कामकाजातील पारदर्शकता आहे. देशात इतक्या गतिमान पद्धतीने निकाल जाहीर करणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पहिलेच असेल.

डॉ. प्रताप दिघावकर, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com