इजिप्तच्या युवा पार्लमेंटसाठी खासदार खडसे यांची निवड

तीन सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama

मुक्ताईनगर : शर्म-अल-शेख (इजिप्त) येथे होणाऱ्या दोनदिवसीय आठव्या आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचे नाव तीन सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी नामनिर्देशित केले आहे. (MP Raksha Khadse will visit Egypt delegation)

Raksha Khadse
आमदार शाह यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत घाम फोडला!

संमेलनस्थळ असलेले शर्म–अल-शेख हे शिनाई द्वीपकल्पातील वाळवंट आणि तांबडा समुद्र यांच्यामधील किनारपट्टीवर वसले असून, हे शहर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राजनैतिक बैठकांसाठी प्रसिद्ध आहे.

Raksha Khadse
जिल्हा बँक संचालकांच्या सहकारमंत्र्यांची दुसऱ्यांदा स्थगिती

या चर्चासत्रात झपाट्याने बदलत असलेल्या जागतिक पर्यावरण हवामान बदलावर जगातील तरुणांबाबत काय विचार आहे व काय उपाय केल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल किंवा ते कसे आटोक्यात ठेवण्यात येईल, या विषयांवर विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी हे संमेलन ‘इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) व इजिप्तशियन पार्लमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जूनला होणार आहे. शिष्टमंडळ मंगळवारी (ता. १४) दिल्ली येथून रवाना होणार असून, १८ जूनला मायदेशी परतणार आहे.

खासदारांकडून संमेलनांमध्ये सहभाग

खासदार रक्षा खडसे आयपीयू इंटर-पार्लमेंटरियन फोरमच्या एशिया पॅसेफिक ग्रुपवर चार वर्षांपासून बोर्ड मेंबर आहेत. या माध्यमातून होणाऱ्या अनेक संमेलन व चर्चासत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाची भूमिका जागतिक मंचावर मांडली आहे. मार्च महिन्यात त्यांनी नुसा-दुआ, बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या १४४ व्या पाच दिवसीय बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com