Sarthi: खासदार गोडसे, `सारथी`चे फुकटचे श्रेय लाटू नका!

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा खासदार गोडसे यांना इशारा.
Hemant Godse & Karan Gaikar
Hemant Godse & Karan GaikarSarkarnama

नाशिक : शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेल्या खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी मराठा समाजाच्या (Maratha community) नावावर राजकारण करून मतांची झोळी भरण्यासाठी फुकटचे श्रेय लाटण्याचा खटाटोप बंद करावा, असा इशारा स्वराज्य संघटनेचे (Swarajya Sanghatna) प्रवक्ते तसेच छावा क्रांती वीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिला आहे. (Sarathi institute`s land allocation is a efforts of Maratha community not MP Godse)

Hemant Godse & Karan Gaikar
Congress Vs BJP : नाना पटोले म्हणाले, राज्यातील मंत्र्यांची मलाईदार खात्यासाठी लढाई चाललीय...

सारथी संस्थेला विभागीय कार्यालयासाठी नाशिक शहरात सहा हजार चौरस फूट जागा शासनाने उपलब्द करून दिल्यानंतर या कामाचे श्रेय लाटणाऱ्या बातम्या प्रसारित करून आणण्याचा प्रयत्न खासदार गोडसे यांच्याकडून सुरु असल्याने मराठा समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Hemant Godse & Karan Gaikar
Balasaheb Thorat: भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच उद्दिष्ट

श्री. गायकर म्हणाले, मराठा समाजाच्या कुठल्याही आंदोलनात निरपेक्ष सहभाग न नोंदवणारे, या आंदोलनाचे गुन्हे अंगावर घेतलेल्या तरुणांना वाऱ्यावर सोडणारे, स्वतःवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काळजी घेणारे हे खासदार आज समाजाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा फुकाचा अट्टाहास करून सारथी सारख्या संस्थेच्या जागेचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, अशा समाजाच्या भावना आहेत.

या भावनांना प्राथमिक स्वरूपात वाट मोकळी करून देतांना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते आणि छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनी खासदार गोडसे यांच्यावर टिका केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गायकर यांनी म्हटले आहे की, खासदार गोडसे यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये किती वेळा भूमिका मांडली. ती समाजापुढे आणावी. खासदार गोडसे नाशिक मध्ये झालेल्या किती आंदोलनांमध्ये उपोषणांमध्ये सहभागी होते, त्याचेही पुरावे द्यावेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून किंवा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून केलेल्या आंदोलनांमध्ये किती गुन्हे दाखल आहेत हे स्पष्ट करावं. फक्त एखादं निवेदन दिल्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही. .

खासदार गोडसे यांनी समाजाची दिशाभूल करू नये एवढी आमची विनंती आहे सारथी शिक्षण संस्था ही नाशिक विभागाला मिळाली ते मराठा क्रांती मोर्चाचे यश आहे. छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे. ते कोण्या एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे यश आहे त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी अशा खोट्या-नाट्या बातम्या देणे खासदार गोडसेंनी थांबवावे. त्यांनी त्यांचे राजकारण खुशाल करावं परंतु समाजाची दिशाभूल करून किंवा खोट्यानाट्या बातम्या पसरवून राजकारण करू नये आणि खासदार गोडसे यांच्या पत्राने जर असे प्रश्न सुटत असतील तर त्यांनी निश्चितपणे मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडून त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आक्रमक व्हावे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे आम्ही निश्चितपणे त्यांचे अभिनंदन करू असेही गायकर यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला. आझाद मैदान येथे छत्रपती संभाजी राजेंनी स्वतः तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करून ही मागणी मान्य करून घेतली. याचा विसर कदाचित खासदार गोडसे यांना पडलेला दिसतो. त्यांना फक्त निवडणुका आल्या की समाज समाजाची आठवण होते.

-करण गायकर, प्रवक्ता, स्वराज्य संघटना.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com