खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, आज मी जे आहे ते केवळ संविधानामुळेच!

खासदार डॉ. हीना गावित यांच्या उपस्थितीतअर्हत प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनानिमित्त कायर्क्रम
Dr Heena Gavit
Dr Heena GavitSarkarnama

नंदुरबार : भारतीय संविधानाने समाज व देशात कायद्याचे राज्य आणले. समानता आणली. महिला, सामान्यांना व तळागाळातील घटकांना न्याय व अधिकार दिले. आज मी जे काही आहे ते केवळ संविधानामुळेच आहे. अन्यथा ते शक्य झाले नसते, असे प्रतिपादन खासदार डॉ. हीना गावित (Dr. Heena Gavit) यांनी केले.

Dr Heena Gavit
नाशिकच्या प्रशासनाने धसका घेतलेला तो `आर्यनमन` आहे तरी कोण?

संविधान दिनानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. गावित संविधानाची महती समजावून सांगतांना म्हणाल्या, की आज मी जे काही आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आहे. ओबीसी, एस.सी., एस.टी. आणि इतरांना जे प्रतिनिधित्व करता आले, ते संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळेच. भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून, त्याची वर्षभर जनजागृती झाली पाहिजे. त्यात समाजातील सर्व स्तरातील जबाबदार घटकांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे.

Dr Heena Gavit
अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

कार्यक्रमाचे उद्‍घाटन डॉ. हीना गावित तसेच जि. प. सदस्या डॉ. सुप्रिया गावित यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाचे पूजन केले. संयोजन सुभाष पानपाटील यांनी प्रमुख पाहुणे डॉ. हीना गावीत व डॉ. सुप्रिया गावित यांचा सत्कार केला. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

दरम्यान, एस. ए. मिशन हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी पूजा वसावे हिने मनोगत व्यक्त केले. अमोल पगारे यांनी संविधान जागविण्याची व जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम भारतीय म्हणून सर्वांचे आहे, असे सांगितले. यावेळी राम साळंके, स्वरूप बोरसे, सुरेंद्र ठाकरे, प्रविण वाघ, डी. के. नेरकर, संजू रगडे, मोहन खानवाणी, जितेंद्र पवार, ॲड. सुनिल जाधव, बापू साळवे, संतोष शिरसाठ, कमल कडोसे, ललित सुर्यवंशी, किरण गवळे, सुनील महिरे आदी उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in