MP bus accident : गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना...

MP bus accident :अपघातातील काही प्रवाशांना वाचावता येईल का? यासाठीही प्रयत्न सुरु आहे.
MSRTC Bus Accident News
MSRTC Bus Accident NewsSarkarnama

MP bus accident : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आज (ता.18 जुलै) सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात (madhya pradesh bus accident) झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारने बचावकार्यासाठी आतापर्यंत काय केलं याबाबत माहिती दिली. तसेच भाजपाचे नेते माजी मंत्री गिरिश महाजन (Girish Mahajan) यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माझे बचावकार्यावर लक्ष असल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यांनी मुंबईत त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.(Indore-Amalner bus accident news update)

MSRTC Bus Accident News
ST Accident : आठ जणांची ओळख पटली; चौघे जळगावचे, चालक-वाहकाचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आहे. या घटनेबाबत मध्यप्रदेश सरकार एका मंत्र्याची नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशातील धार येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला असून यामध्ये आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासन तत्काळ घटनास्थळी पाठवून कारवाई सुरु केली असून अपघातातील काही प्रवाशांना वाचावता येईल का? यासाठीही प्रयत्न सुरु आहे. आपलेही काही लोक तेथे पोहोचले असून महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात बचावकार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात असून धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तेथील परिस्थिती मला दाखवली आहे. सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. मात्र कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जे बेपत्ता झाले त्यांना शोधण्याचे काम सुरु असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

MSRTC Bus Accident News
इंदूर- अमळनेर बस अपघात : मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

दरम्यान, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in