विखेंनी केला करेक्ट कार्यक्रम; थोरातांच्या मतदारसंघातील इंदोरीकरांच्या सासूबाईंचा भाजपमध्ये प्रवेश

Sangamner News : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Indurikar Maharaj
Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Indurikar MaharajSarkarnama

Radhakrishna Vikhe Patil : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या सरपंच असून काही दिवसापूर्वी झालेल्या निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शशिकला पवार यांचा विजय झाला होता. त्यानंतर त्या नेमकी कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

मात्र, शशिकला पवार यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. शशिकला पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Indurikar Maharaj
Shivsena : लग्नासाठी मुलगी मिळत नाही, तुमच्या सर्कलमध्ये पहा ना ; आमदार राजपूतांना तरुणाचा फोन..

निळवंडे ग्रामपंचायतीमध्ये शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कॉंग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही निळवंडे ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. मात्र, 'थोरात यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करत आहे,' असं शशिकला पवार यांनी सांगितलं.

Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Indurikar Maharaj
'' राज्यात पवारांनी आघाडीचं सरकार आणलं अन् तटकरेंच्या मनात 'ही' भावना आली...''; अजितदादांची कोपरखळी

दरम्यान, निळवंडे गाव संगमनेर तालुक्यातील असून या मतदारसंघात बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत. या मतदारसंघातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या निळवंडे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सरपंच आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला असल्याने थोरातांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com