Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

धुळे शहरात महागाईच्या प्रश्‍नावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले.
MLA Kunal patil with congress workers
MLA Kunal patil with congress workersSarkarnama

धुळे : सामान्य माणसाचा आवाज काँग्रेसच्या (Congress) माध्यमातून बुलंद होत असून, मोदी सरकारने (Modi Government) वाढविलेल्या जीएसटीमुळे (GST) जनतेचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण, अशी स्थिती आहे. त्यामुळे मोदी सरकारने वाढविलेली महागाई आणि दडपशाही विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी शुक्रवारी क्युमाईन क्लबजवळील आंदोलनाद्वारे केले. (Congress had done a aggressive agutaion at Dhule against modi Goernment)

MLA Kunal patil with congress workers
Nashik News: समता परिषदेच्या कार्यकारीणीत खांदे पालट!

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, आमदार पाटील यांच्या नेतृत्वात महागाईप्रश्‍नी राज्यव्यापी आंदोलन झाले. आमदार पाटील म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.

MLA Kunal patil with congress workers
BJP News: अमरीशभाई म्हणतात, पेसातील गावांना महसुली दर्जा मिळावा!

केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत सुरू केलेल्या भारतीय सैन्य दलातील ‘अग्निपथ’ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व बाबींच्या विरोधासाठी पक्षातर्फे आंदोलन झाले. महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. जीएसटीच्या पैशातून गरिबांऐवजी उद्योगपतींचे खिसे भरले जात आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला.

यावेळी माजी खासदार बापू चौरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, ज्येष्ठ रमेश श्रीखंडे, साबीर शेख, लहू पाटील, डॉ. एस. टी. पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, भानुदास गांगुर्डे, डॉ. अनिल भामरे, मुजफ्फर हुसैन, गायत्री जयस्वाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in