मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले

भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस,आमदार देवयानी फरांदे यांची माहिती.
MLA Devyani Pharande & BJP leaders
MLA Devyani Pharande & BJP leadersSarkarnama

नाशिक: मोदी सरकारच्या (Narendra Modi) गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण मिळाले आहे. कोरोना (Covid19) काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात आले. अशी माहिती भाजपाच्या (BJP) प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी दिली. (Centre Governments various plans help out poor & Needy)

MLA Devyani Pharande & BJP leaders
नाना पटोलेंच्या दणका; शरद आहेर यांचे काँग्रेस शहराध्यक्ष पद गेले!

त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे.

MLA Devyani Pharande & BJP leaders
रशीद शेख म्हणाले, आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे’ हे अभियान सुरु केले आहे. यासंदर्भात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली असून वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द करणे, राम मंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणा-या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, प्रदेश कार्यकारीणी सदस्य माधुरी पालवे- पढार, वैद्यकिय आघाडी सहप्रमुख सोनल दगडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, गोविंद बोरसे, सुरेश आण्णा पाटील आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com