मनसे म्हणते युती करू...भाजपचे मात्र तोंडावर बोट!

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. सगळ्यांचीच त्यासाठी तयारी सुरु आहे.
Raj Thakre,MNS
Raj Thakre,MNSSarkarnama

नाशिक : महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. (NMC election is coming soon) सगळ्यांचीच त्यासाठी तयारी सुरु आहे. गतवर्षी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होऊन त्यांची सत्ता आली. (BJP came in power in last election) त्यात उत्तर भारतीय मतांचा मोठा वाटा होता. (North indian voters share is majorin Nashik) याचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) भाजपशी (BJP) युती करण्यास उत्सुक असली तरी भाजपने यावर सध्या मौन बाळगणे पसंत केले आहे.

Raj Thakre,MNS
`ईडी`ची कारवाई विसरून राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी!

महानगरपालिकेत सध्या सत्तेत भाजप तर मनसेचे १२२ मध्ये अवघे पाच सदस्य आहेत. त्यात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी मनसेने मेहनत घेतली आहे. त्यांचे सातत्याने उपक्रम, नेत्यांचे दौरे सुरु आहेत. परंतु राज्यात महाविकास आघाडीची सत्ता व शिवसेनेसारख्या प्रबळ विरोधक, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी यांचा विचार करता मनसेने राजकीय मित्र शोधण्यास सुरवात केली आहे. त्यांना सध्या तरी भाजप हा एकमेव पर्याय आहे. भाजपला त्यांनी तसे संकेत दिले आहेत. मात्रउत्तर भारतीय मतांवरील संभाव्य परिणाम विचारात घेऊन भाजपने यावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

Raj Thakre,MNS
मिनी मंत्रालयाचे निकाल अन् नाशिकचे भवितव्य ठरवणार!

महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे भाजप व मनसेची युती चर्चा सुरू आहे. परंतु, मनसैनिकांना भाजप बरोबर युती हवी असली तरी उत्तर भारतीय मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने भाजप मनसेसोबत युती करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका व पुढील वर्षात होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीवर मनसे- भाजप युतीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून युतीबाबत अद्याप कुठलीच भूमिका घेतली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढील वर्षाच्या सुरवातीला नाशिकसह राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून मैदानात उतरल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. असा मतप्रवाह तयार झाला आहे. त्यातून नाशिक महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या बैठका घेण्याचे नियोजन सुरु आहे. सन २०१२ मध्ये महापालिकेत सत्तेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक तयारी सुरु असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात उतरत असतील तर भाजप बरोबर युती व्हावी अशी इच्छा मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करतं आहे. भाजप सोबत युती झाल्यास मनसेला आधार मिळून काही प्रमाणात सत्तेत वाटेकरी होता येईल असे मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मराठी मतांचे विभाजन करून आत्मा असलेल्या मुंबई महापालिकेपासून शिवसेनेला रोखता येणे शक्य असल्याने भाजप मध्ये देखील मनसेसोबत युतीचा एक मतप्रवाह आहे. परंतु, सोबत घेतल्यास मनसेला अधिक फायदा होईल असे दिसून येत आहे तर भाजपला उत्तर भारतीय मतांची चिंता आहे. पुढील वर्षात उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहे. मनसेने उत्तर भारतीय नागरिकांविरुद्ध यापूर्वी आघाडी उघडली होती. अद्यापही अधूनमधून मराठीच्या डरकाळ्या फोडताना उत्तर भारतीयांना लक्ष केले जाते. मनसेसोबत युती झाल्यास मुंबईतील उत्तर भारतीय मते मिळतील की नाही, याबाबत साशंकता आहे. मुंबईपेक्षा उत्तर प्रदेशातील मतदारांवर मनसे युतीचा नकारात्मक प्रभाव पडण्याची भीती असल्याने भाजपमध्ये मनसे सोबत युती करताना सावध भूमिका घेतली जात आहे.

२०१२ मध्ये भाजप सोबतीला

उत्तर भारतीय मतांची चिंता भाजपमध्ये व्यक्त केली जात असली तरी सन २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता स्थापनेसाठी पहिले अडीच वर्षे भाजपने मदत केली होती. त्याबदल्यात उपमहापौर व प्रभाग समिती सभापती पदे भाजपला मिळाले होते. सन २०१२ मधील पंचवार्षिक च्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपने पाठिंबा दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मनसेने सत्ता मिळविली होती. पहिल्या टर्ममध्ये निवडणुकीनंतर झालेल्या युती होवू शकते, तर पुढील निवडणुकांमध्ये देखील भाजप-मनसेची युती शक्य असल्याचे दाखले युतीसाठी उत्सुक असलेल्या भाजप व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in